पोहेगांव प्रतिनिधी : पोहेगाव नागरी पतसंस्थेची 200 कोटीकडे चाललेली वाटचाल व नुकतीच दहा जिल्ह्यात पुणे व नाशिक विभागीय भौगोलिक कार्यक्षेत्राची वाढ ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे . संस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांनी केलेल्या पाठपुरावामुळेच हे शक्य झाल्याने संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने नितीनराव औताडे यांचा संस्थेच्या सभागृहात सन्मान व सत्कार करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या पोहेगांव नागरी पतसंस्थेने पारदर्शक कारभार व विश्वासाच्या जोरावर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संस्थेचे संस्थापक नितीनराव औताडे यांच्या पाठपुरावामुळे पोहेगाव नागरी पतसंस्थेच्या भौगोलिक कार्यक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. नाशिक व पुणे विभागात दहा जिल्ह्यात ही वाढ झाली आहे. यामुळे संस्थेची प्रगती वाढणार आहे असे स्थैर्य निधीचे संचालक रमेश झांबरे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे ,उपाध्यक्ष विलास रत्ने, जेष्ठ संचालक रमेश झांबरे,रियाज शेख, प्रतापराव गायकवाड, प्रमोद भालेराव, भाऊसाहेब वाघ, व्यवस्थापक सुभाष औताडे,सह व्यवस्थापक विठ्ठल घारे,कोपरगाव शाखेच्या सौ. जयश्री माळवे,शिर्डी शाखेचे व्यवस्थापक सोमनाथ मोजड वसुली अधिकारी मारुती लिंभुरे अदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व प्रास्ताविक रियाज शेख यांनी केले तर आभार भाऊसाहेब वाघ यांनी मानले.