कोपरगाव( वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथे कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सहा क्विंटल सोयाबीन बियाण्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत साई कृषी मित्र गट पोहेगाव या शेतकरी गटाची नोंदणी करण्यात आलेली आहे. या गटाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विस्तार कार्यक्रम, उत्पादन वाढ, मूल्यवर्धन, सामूहिक बाजारपेठ, शासकीय योजना आदी उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती गटाचे अध्यक्ष राजेंद्र औताडे यांनी दिली.शेतकरी सहकारी संघाचे कर्मचारी प्रकाश लोंढे यांनी सांगितले की सोयाबीन बी पेरण्यापूर्वी शेतीमध्ये असलेल्या ओलीचा अंदाज शेतकऱ्यांनी घ्यायला हवा. दुबार पेरणीचे संकट कसे टाळता येईल याकडे लक्ष देणे गरजेचेआहे.पोहेगाव येथील कृषी गटाचे काम चांगले असून अल्पावधीतच त्यांनी गटाची ओळख निर्माण केली.
कोपरगाव तालुका कृषी विभागांतर्गत गटातील शेतकऱ्यांना काल सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी गटाचे अध्यक्ष राजेंद्र औताडे ,ॲड राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, नितीन नवले, धनंजय रांधव, शंकर औताडे, संतोष पानगव्हाणे, अनिल औताडे, गणेश औताडे, रावसाहेब औताडे,प्रदीप औताडे, पांडुरंग औताडे, रामदास औताडे, समीर शिंदे, विशाल रोहमारे ,माऊली जाधव, सचिव संजय घारे , प्रकाश लोंढे,महंमद सय्यद, बाबासाहेब औताडे, बाळासाहेब वेताळ, किशोर जाधव आदी उपस्थित होते. शेवटी आभार राहुल रोहमारे यांनी मानले.