पोहेगावांत लोकवर्गणीतून साकारणार संत शिरोमणी नामदेव महाराजांचे मंदिर 

0

महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुजाअर्चा 

कोपरगाव (प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज व समस्त ग्रामस्थ पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. बुधवारी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मंहंत रमेशगिरी महाराज व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या हस्ते मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे.  रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते पुजा अर्चा संपन्न झाली.

पूजाविधी सौ सुरेखा रमेश झांबरे व  स्थैर्य निधीचे संचालक रमेश रामचंद्र झांबरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपसरपंच अमोल औताडे, माजी पोलीस पाटील तात्यासाहेब झांबरे, ज्ञानेश्वर झांबरे, गणेश झांबरे, श्रीकांत रांधव, प्रकाश रोहमारे, रघुनाथ देवडे, डॉ गवळी, सुभाष देवगिरे, शांताराम देवगिरे, अशोक देवगिरे, अक्षय देवगिरे, गणेश झांबरे, ज्ञानेश्वर बोरकर, योगेश बोरकर, स्वप्निल देवगिरे, रवी भुसे, अक्षय देवगिरे अदी उपस्थित होते.

नामदेव महाराजांच्या मंदिरासाठी पोहेगाव ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली असून 11 लाख रुपये खर्चाचे भव्य मंदिर येथे साकारण्यात येणार आहे असे  मंदिर बांधकाम कृती समितीचे सदस्य रमेश झांबरे यांनी सांगितले. मंदिरासाठी ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली असून गेल्या अनेक वर्षाची संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाची नामदेव महाराजांचे मंदिर बांधण्याची प्रतीक्षा संपली आहे. लवकरात लवकर मंदिर पूर्ण होऊन ते परिसरातील भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे असे नितीनराव औताडे यांनी सांगितले. शेवटी सरपंच सर्वाचे आभार तात्यासाहेब झांबरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here