कोपरगाव( वार्ताहर): कोपरगाव तालुक्यातील सहकार सोसायटीच्या चळवळीतील अग्रगण्य असलेल्या पोहेगाव नंबर एक विकास सोसायटीने चालू आर्थिक वर्षात सभासद व बँक पातळीवर शंभर टक्के वसूल देण्याची किमया केली असून यामुळे सरकारकडन व्याजदरात संस्थेच्या सभासदांना सूट मिळणार आहे अशी माहिती पोहेगांव नंबर एक विकास सोसायटीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.
प्रसाद आणि पीक कर्जाची वसुली करत जिल्हा बँकेचा इष्टांग पूर्ण केला आहे.संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष कचेश्वर रांधव, सचिव बाळासाहेब खांडगे, सहसचिव दादा गवारे, निलेश जाधव व संचालक मंडळाने 2022 23 च्या आर्थिक वर्षात सभासदांना कर्ज वसुलीसाठी प्रोत्साहित केले होते. सभासदांनी ही या गोष्टीला दात देत 30/6 अखेर घेतलेले कर्जास जिल्हा बँकेल वसूल दिले.या संस्थेची सभासद संख्या 398 असून 215 शेतकरी सभासदांनी जिल्हा बँकेकडून 2 कोटी 57 लाख 5 हजार रुपये कर्ज घेतले होते त्याची वेळेत कर्जफेड केल्याने शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा अर्थात तीन टक्के व्याज दारात सूट मिळणार आहे.पोहेगांव नंबर एक सोसायटीने जिल्हा बँकेला बँक व मेंबर पातळीवर शंभर टक्के वसुली दिल्याबद्दल सभासदांचे संजय शिंदे यांनी आभार मानले आहे.