पोहेगाव नंबर १ विकास सोसायटीची विकासाकडे वाटचाल..आ आशुतोष काळे 

0

कै माधवराव बारकुजी पा.शिंदे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे लोकार्पण

कोपरगाव (प्रतिनिधी) पोहेगाव नंबर १ विकास सोसायटीच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष कचेश्वर रांधव व संचालकांच्या दूरदृष्टी दृष्टिकोनातून सभासदांच्या मुलांना व्यवसायाला चालना मिळावी म्हणून शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी केली. संस्थेचा पूर्वीचा चढ उतारीचा काळ आता संपलेला आहे. प्रशासकीय अधिकारी ज्याअर्थी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतात त्या अर्थी संस्थेचा कारभार स्वच्छ आहे. सभासदांच्या हितासाठी संस्था विविध विकासात्मक निर्णय घेत आहे. या संस्थेची आता विकासाकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे प्रतिपादन कोपरगाव मतदार संघाचे आ. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पोहेगाव नंबर १ विकास सोसायटीच्या कै माधवराव बारकुजी पा. शिंदे शॉपिंग कॉम्प्लेक्सचे लोकार्पण करताना बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराज व स्व. माधवराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन व नाम फलकाचे अनावरण आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शारदानंदगिरीजी महाराज, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण,सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, तालुका विकास अधिकारी अविनाश काटे,श्री रहाणे,अशोकराव रोहमारे,रमेशराव रोहमारे,एम टी रोहमारे, संस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष कचेश्वर रांधव, काळे कारखान्याचे संचालक गंगाधर औताडे, प्रवीण शिंदे, सचिन रोहमारे, जयंत रोहमारे,देवेन रोहमारे, सुनील शिंदे , अमोल औताडे,

मधुकर औताडे ,साहेबराव गायकवाड, चांगदेवराव जाधव, एकनाथ औताडे, गोरखनाथ नवले, चंद्रकांत औताडे, काका शिंदे, सिताराम वाके, सुनील वाके, नरहरी रोहमारे ,श्रीकांत रांधव नंदकिशोर औताडे, बाळासाहेब औताडे, वाल्मीक नवले, राजेंद्र गरुड,रावसाहेब भुजबळ, आण्णासाहेब चौधरी,राजेंद्र औताडे,योगेश भुजबळ, दिलीप भुजबळ, सुनील चौधरी, योगेश औताडे ,विठ्ठल जावळे, साहेबराव निकाळे,संस्थेचे सचिव बाळासाहेब खांडगे, सहसचिव दादा गवारे, एकनाथ गव्हाणे, निलेश जाधव, पानगव्हाणे अदी उपस्थित होते. सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ व तालुका विकास अधिकारी अविनाश काटे यांनी संस्था गेल्या पंधरा वर्षापासून सभासद व बँक पातळीवर वसूल देत असून संस्थेचा विकासाचा आलेख वाढत चाललेला आहे असे सांगितले. मान्यवर मंडळींचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक साहेबराव गायकवाड यांनी केले. तर आभार संस्थेचे संचालक चंद्रकांत औताडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here