पोहेगाव शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला टिपरी नृत्याचा आनंद 

0

पोहेगांव.. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुली येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी टिपरी नृत्याचा आनंद लुटला.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे , सरपंच अलकाताई जाधव , उपसरपंच अमोल औताडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा नवनवीन उपक्रम राबवत आहे. दर शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम सध्या या शाळेत सुरू आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पोहेगांव मुले व पोहेगांव मुली या दोन्ही मराठी शाळेत टिपरी नृत्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. 

नवरात्र उत्सव सोहळ्यात केले जाणारे उपवास व स्त्री शक्तीचा जागर व आदर्श महिला याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक श्री दिघे यांनी नवरात्र उत्सव का साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला कसे महत्त्व याबद्दल माहिती सांगितली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती डोंगरे  , श्रीमती अंधारे , श्रीमती राऊत , श्रीमती हरदास , श्रीमती निलोफर शेख, श्रीमती सोनवणे, श्री दिघे श्री झावरे, श्री गोरे  श्री सैदाने , टपाल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती बोरसे यांनी केले तर आभार व सूत्रसंचालक प्रतिभा राऊत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here