प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात त्यामुळे शिक्षण थांबवु नका – डॉ. इम्रान खान

0

 संजीवनी फार्मसी महाविद्यालयात नवगतांचे स्वागत आणि मार्गदर्शन
कोपरगांव: आजची पिढी ही भारताचे भविष्य  आहे. जीवनात संघर्ष  असतो, परंतु जिध्द असल्यास यशाकडे जाता येते. प्रत्येकाच्या आयुष्यात  चढ उतार असतात. मात्र सतत शिकत  रहा, फार्मसी क्षेत्रात भरपुर संधी आहेत, असे प्रतिपादन टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीचे डिलिव्हरी हेड डॉ. इम्रान खान यांनी केले.
      संजीवनी फार्मसी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष  २०२४-२५ मध्ये बी. फार्मसी व एम.फार्मसीच्या प्रथम वर्षात  प्रवेश  घेतलेल्या नवगतांचे स्वागत तसेच अगोदर शिकत  असलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. खान प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर टीसीएस कंपनीचे एचआर हेड मेहुल कोठारे, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, व्हाईस प्रेसिडेंट-कार्पोरेट रिलेशन्स इम्रान शेख, डीन अकॅडमिक्स डॉ. सरीता पवार, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी उद्योजक स्व. रतन टाटा यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

डॉ. पवार यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट  केला. डॉ. पटेल यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. यात ते म्हणाले की व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली  या महाविद्यालयाने नावलौकिक प्राप्त केला आहे. येथे एकुण २० प्रयोगशाळा  असुन त्यात  रू ३ कोटीची उपकरणेे आहेत. ग्रंथालयात १५ हजार पुस्तके आहेत. संशोधनात  हे महाविद्यालय पुढे असुन भारत सरकारने संशोधन  कार्यास रू २ कोटीचा निधी दिला आहे. मागील वर्षात  ज्यांना नोकऱ्या  पाहीजे त्या ८५ टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन दिल्या असुन अनेक फार्मसी कंपन्यांशी  परस्पर समझोता करार केले आहे.

डॉ. खान यांनी  फार्मसी शिक्षण  पुर्ण केल्यावर काय संधी आहेत, याची सखोल माहिती दिली तसेच एखादे औषध औषधनिर्माण कंपन्यांमधुन कसे उदयाला येते आणि ते मार्केटमध्ये जाते, याची पुर्ण प्रक्रिया समजुन सांगीतली. उद्योग जगताला एखाद्याची  नोकरीसाठी निवड करायची असेल तर त्या उमेदवाराकडे आपल्या शिक्षणाच्या ज्ञानाबरोबरच संभाषण कौषल्याचे सामर्थ्य, टीम स्पिरीट  अर्थात सांघिक काम करण्याचे चैतन्य  आणि किती कमी वेळात नविन बाबींचे शिक्षण  घेवु शकतो, हे गुण असणे आवश्यक  आहे. नोकरी मिळाल्यावर सुरूवातीचे दोन वर्षे  किती पगार मिळतो, याचा विचार करू नका, या कालावधीमध्ये वशिष्टपुर्ण ज्ञान मिळवा आणि स्वतःला सिध्द करा. आपले ध्येय नेहमी उच्च ठेवा, असे डॉ. खान शेवटी म्हणाले.
श्री कोठारे टीसीएस बाबत बोलताना म्हणाले की टीसीएस मध्ये शिकायला भरपुर मिळते आणि स्वतःची प्रगतीही साधता येते. टीसीएस मध्ये प्रशिक्षणावर  अधिक भर दिला जातो. युवक युवतींना पुढील काळात भरपुर संधी असुन त्यांनी परदेशी  भाषा सुध्दा आत्मसात कराव्यात. वेळेचे व्यवस्थापन करा, असे कोठारे शेवटी म्हणाले.

डॉ. खान वकोठारे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच दोघेही म्हणाले की तुम्ही जसे संजीवनीत प्रवेश  घेवुन संजीवनीचे सदस्य बनलात, तसे टीसीएस मध्येही शिक्षण  पुर्ण झाल्यावर आपले स्वागत आहे आणि टीसीएसचे सदस्य बना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here