प्रभाग ८ मधील रस्ते व मुलभूत विकास कामे तातडीने सुरु करा : राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ८ मधील रस्त्यांची कामे प्रलंबित असून त्याचबरोबर इतरही विकास कामे झालेली नाही त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रलंबित विकासकामे तातडीने सुरु करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, धुमाळ घर ते भैय्या तिवारी घर लक्ष्मी माता मंदिर व राजू उशिरे घर ते सुभाषनगर दर्गा व हाजी मंगल कार्यालयाच्या पश्चिम बाजूकडील अकबर पठाण ते जब्बार कुरेशी घर रस्ता कॉंक्रीटीकरण करावा, आयेशा कॉलनी परिसरात पथदिवे बसवावे, सुभाषनगरमधील बंद हातपंप सुरु करावे, बैल बाजार रोड ते खंदक नाला पर्यंत अपूर्णावस्थेत असलेले भूमिगत गटारीचे काम पूर्ण करावे, बैल बाजार रोड वरील मेहबूब कॉलनी व समोरील बाजूस चार इंची पाण्याची पाईप लाईन टाकावी, बैल बाजार रोड वरील नसीर सय्यद यांच्या दुकानापासून अपना  बेकरी पर्यंत भूमिगत गटार बनवावी आदी मागण्या  दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सदर निवेदनाची दखल घेवून तातडीने विकासकामे करू अशी ग्वाही मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांनी दिली आहे. .

यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, इम्तियाज अत्तार, मनोज शिंदे, रहेमान कुरेशी, सुरेंद्र सोनटक्के, सचिन शिंदे, संजय गोधे, शेखर डाहाके, सोहेल शहा, अश्पाक शेख, शोएब खाटीक, रेहान खाटीक, अरशद कुरेशी, राजु  निकम, निहाल  शेख, समीर  कुरेशी, महेबूब  खाटीक, शकील  शेख, जुबेर  शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here