कोपरगांव (वार्ताहर) दि. २५ डिसेंबर २०२२ –
एकटेपणा, एकाकीपणा प्रत्येकाच्या वाट्याला असतो, त्यावेळी परमेश्वर, सखा, ईश्वर, अल्ला, मसीहा, येशू, देव अवतार, संत-महंत हेच त्यांचे आधार असतात, संकटात वैयक्तीक केलेल्या प्रार्थनेतून बळ मिळत असते असा प्रभु येशू जगाचा तारणहार असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
नाताळ ख्रिसमस सणानिमीत्त कोपरगाव शहर व तालुकावासियांना भाजपाच्यावतीने सदिच्छा देऊन शहरातील प्रत्येक नागरिकावर तसेच कोपरगांववासियावर ओढवलेल्या संकटातून मार्ग सापडू दे अशी प्रार्थना सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी पोलीस स्थानकाजवळील मेथोडिस्ट चर्च मध्ये केली., त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. फादर अजय भोसले यांचा सत्कार करण्यांत आला. फादर अजय भोसले यांनी प्रभू येशूच्या आठवणींना उजाळा दिला. ख्रिश्चन समाजातील महिलांसह अनेक बांधवांनी रुग्णांच्या विविध आजारपणात केलेली मदत कदापि विसरता येणार नाही, कोपरगाव वर राहता फादरवाडी भागात ख्रिश्चन मिशनरीचे कार्य कौतुकास्पद आहे असेही सौ. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या.
प्रारंभ अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग संधान यांनी प्रास्तविक केले.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी ख्रिश्चन बांधवांच्या प्रत्येक अडी-अडचणी दुर करण्यासाठी आजवर प्रयत्न केलेले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे ख्रिश्चन बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत अग्रभागी असतात.
ख्रिश्चन धर्म जगात सर्वात मोठा आहे, प्रभु येशू यांनी प्रार्थनेतून जगावरील संकटे दूर करण्यासाठी बळ दिले. हा पवित्र सण जगभर साजरा होत असतानांच आपल्यावर पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यादृष्टीने सर्व राज्यांना खबरदारी घेण्याबाबत सुचना केल्या आहेत. कोपरगांव शहर व तालुक्यातील तसेच पुणतांबा परिसरातील ख्रिश्चन बांधवांच्या आनंदात आपला सहभाग असुन त्यांच्या यापुढे उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सतत प्रयत्नशिल राहू असे त्या म्हणाल्या. बच्चे कंपनी सांताक्लॉजच्या माध्यमातून आपल्या जीवनातील आनंद अधिक द्विगुणीत करत असतात.
याप्रसंगी रिपाईचे तालुका अध्यक्ष जितेंद्र रणशूर, संदीप देवकर, सचिन सावंत, किरण सुपेकर, दादा नाईकवाडे, राजन त्रीभुवण, नायडू अंकल, जॉन्सन पाटोळ, गायकवाड मिस्तरी, रोहिदास पाखरे, विश्वास पाटोळे, दादा पाटोळे, त्रिभुवन ताई यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाताळनिमित्त शहरातील तसेच फादरवाडी, पुणतांबा, खडकी, शिंदे शिंगी नगर आदी परिसरातील चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शेवटी जॉन्सन पाटोळे यांनी आभार मानले.