प्रसाद शिंदे यांचा मास्टर डिग्री मिळवल्याबद्दल अमेरिकेत गौरव 

0

पोहेगांव : कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथील भुमिपत्र तसेच शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, कळवण चे प्राचार्य बी. एन. शिंदे व सौ वैशाली शिंदे यांचे चिरंजीव  प्रसाद भाऊसाहेब शिंदे यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील SAN JOSE STATE UNIVERSITY मध्ये मास्टर डिग्री (Masters degree in Industrial and systems)  प्राप्त करून देदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांना युनिव्हर्सिटी तर्फे अमेरिकेत गौरविण्यात आले.

          माझा सन्मान हा माझे आईवडील, शिक्षक,नातेवाईक, मित्र मंडळी तसेच संपूर्ण कोपरगाव तालुक्याचा व मुर्शतपुर गावचा सन्मान आहे असं मत त्यांनी आपल्या पदवीदान समारंभा मध्ये अभिव्यक्त केले.

  चिरंजीव प्रसाद हा नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील श्री. गुरुदत्त शिक्षण संस्थेचे डायरेक्टर आणि शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, कळवण चे प्राचार्य बी. एन. शिंदे सर व सौ. वैशाली शिंदे  यांचे सुपुत्र आहे. त्यांनी शालेय जीवनातच परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगले आणि कठोर परिश्रम करून आपले स्वप्न साकार केले .

            आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले.भारतामध्ये इंजिनिअरिंग पूर्ण करून अमेरिकेमध्ये मास्टर डिग्री प्राप्त करत उज्वल यश संपादन केले.

          त्यांच्या या उज्वल यशामध्ये सर्व प्रथम त्यांचे माता-पिता, सर्व नातेवाईक तसेच शिक्षक, मित्रपरिवार या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

            चि. प्रसाद यांनी शरद पवार इंटरनॅशनल स्कूल कळवण येथे आपले प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुणे येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजीनियरिंग पूर्ण केले व आपले स्वप्न साकारण्यासाठी अमेरिकेतील SAN JOSE STATE UNIVERSITY  कॅलिफोर्निया मध्ये आपली मास्टर डिग्री त्यांनी प्राप्त करून सर्वांना अभिमान वाटावा असे नेत्र दीपक यश संपादन केले.

            त्यांच्या या यशाबद्दल श्री गुरुदत्त उद्योग समूह आणि श्री गुरुदत्त शिक्षण संस्था कळवणचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय ‘वनश्री’ डॉ. श्री.जे. डी. पवार (आण्णासाहेब ) यांनी त्यांचे  कौतुक करुन मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. मुर्शतपुर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here