संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवार दिनांक १२ जानेवारी रोजी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी ९ ते ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना घुगरकर म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व राबवून देशातील सहकाराला दिशा दिली. स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जयंती निमित्त संगमनेर तालुक्यात प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. त्यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी नऊ ते पाच या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे.तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अमृत सांस्कृतिक मंडळ व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.