फार्मर कप पुरस्काराचे कृषी मंत्री कोकाटे व अभिनेते अमिर खान यांच्या हस्ते वितरण

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                  सुप्रसिद्ध सिने अभिनेते आमिर खान संचलित सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित ‘फार्मर कप या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील तूर,मूग,उडीद,हरभरा व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या पीकांवरील किडींचे कमीत कमी खर्चात प्रभावीपणे नियंत्रण करून या पिकांच्या उत्पन्नामधे भरघोस वाढ झाल्याचे राहुरी कृषी विद्यापीठाचे कीटकशाश्रज्ञ डॉ.चांगदेव वायळ यांना या वर्षाच्या सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित फार्मर कप पुरस्काराचे बालेवाडी येथे कृषी मंत्री, माणिकरावजी कोकाटे व जेष्ठ अभिनेते अमिर खान यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 

                डॉ.चांगदेव वायळ हे मागील तीन वर्षांपासून तूर,मूग,उडीद,हरभरा व मका या पिकांवरील किडींचे कमीत कमी खर्चात प्रभावीपने एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन व नियंत्रण कसे करायचे ? आणि या पिकांचे चांगले व दर्जेदार उत्पन्न कसे घ्यायचे याबाबत सत्यमेव जयते फार्मर कपच्या दर आठवड्याला होणाऱ्या डिजिटल शेती शाळेमार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करत असतात. डॉ.वायळ म्हणाले की पिकांवरील किडींचे जर आपण वेळीच व्यवस्थापन व नियंत्रण केले नाही तर किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे 30 ते 40 टक्यापर्यंत उत्पन्न घटते. 

              या वर्षाच्या सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशन आयोजित फार्मर कप पुरस्काराचे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील बॅडमिंटन हॉल येथे कृषी मंत्री, ना.माणिकरावजी कोकाटे व जेष्ठ अभिनेते अमिर खान यांच्या शुभहस्ते डॉ.चांगदेव वायळ यांना प्रदान करण्यात आला.

             

 यावेळी पुढे बोलतांना डॉ.वायळ म्हणाले की फार्मर कप 2025 या स्पर्धेत राज्यातील 26 पिकांमधील (4360) चार हजार तीनशे साठहून अधिक शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेत राज्यस्तरावर पहिला नंबर येणाऱ्या शेतकरी गटाला रुपये 25 लाख, दुसऱ्या नंबरला रुपये 15 लाख तर तिसरा नंबर येणाऱ्या शेतकरी गटाला रुपये 10 लाख रुपयाचे बक्षीस दिले जाते. या कार्यक्रमात तालुकास्तरावरील 293 विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी 25 शेतकरी गटांची निवड करण्यात आली होती. यावेळी राज्यस्तरावरील पहिला पुरस्कार तुरची, ता. तासगाव, जि. सांगली येथील भाग्योदय शेतकरी गटाला मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आला. 25 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

               या वेळी पाणी फॉउंडेशनचे प्रमुख आमिर खान, किरण राव, राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पदमश्री पोपटराव पवार,सत्यजित भटकळ,डॉ.अविनाश पोळ,कृषी आयुक्त सुरज मांढरे,सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, सिने अभिनेता अतुल कुलकर्णी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेते जितेंद्र जोशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here