फिर्यादी महिला कोर्टात हजर,मुरकुटे जामीन सुनवणी लांबणीवर 

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी

       अत्याचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी लांबली आहे. फिर्यादी महिला न्यायालयात हजर होवून म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने मुरकुटेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मुरकुटे हे सध्या आजारी असून त्यांच्यावर नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

         

 नगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात पोलिस तसेच सरकारी पक्षाच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले.गुन्ह्यातील फिर्यादी स्वतः न्यायालयात उपस्थित राहिल्या. त्यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली. त्यावर न्यायालयाने दोन दिवसांची मुदत देऊन सुनावणी पुढे ढकलली आहे.न्या. एस. व्ही. सहारे यांच्या न्यायालयासमोर हि सुनावणी सुरू आहे. याप्रकरणात राहुरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आदित्य शिंदे यांनी मुरकुटे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुरकुटे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते.

तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना सिव्हिल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिस गुन्ह्याचा तपास करत आहेत. पीडितेने दिलेल्या पुराव्यांची पोलिसांकडून खातरजमा केली जात आहे. विविध ठिकाणी जाऊन घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले आहेत. न्यायालयात मुरकुटे यांच्या वतीने विधीज्ञ सुमित पाटील, महेश तवले, सुभाष चौधरी, ऋषिकेश बोर्डे हे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here