फुटलेले तळे बुजवण्यासाठी महसूल मंत्र्यांची मदत

झरेकाठीत शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

0

संगमनेर : गत दोन महिन्यापूर्वी झालेल्या मुसळधार आणि धुव्वाधार पावसाने तालुक्यातील झरेकाठी येथील डोळे वस्ती नजीक असणारे तळे पावसाच्या पाण्याच्या दाबाने फुटून गेले होते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना येणाऱ्या उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठी तुटवडा येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे तळे बुजवण्यासाठी जेसीबी यंत्र देऊन येथील शेतकऱ्यांना मदत केली. त्यामुळे झरेकाठी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

              झरेकाठी येथील तळ्याची पावसाच्या जास्तीच्या पाण्यामुळे भिंत फुटली होती. त्यामुळे या तळ्यातून सातत्याने पाणी वाहून जात होते. त्यामुळे येथील युवक कार्यकर्ते आणि पत्रकार सोमनाथ डोळे व परिसरातील शेतकऱ्यांनी या बाबीकडे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधून फुटलेल्या तळ्याची दुरुस्ती करण्यासाठी जेसीबी यंत्राची मागणी केली होती. त्यामुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमनाथ डोळे व शेतकऱ्यांच्या मागणीमुळे तळ्याच्या फुटलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी तात्काळ जेसीपी यंत्र पाठवून दिले व तळ्याची फुटलेली बाजू बुजवण्याचे काम सुरू केले. या तळ्यामुळे झरेकाठी व खळी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. तसेच तळ्याच्या कडेला असणाऱ्या विहिरींना सुद्धा पाणी टिकून राहणार आहे. विशेषतः डोळे मळा, चौधरी वस्ती, बिरोबा मंदिर वस्ती, या परिसरातील शेतकऱ्यांना तळ्यातील या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सुदामराव वाणी, पत्रकार सोमनाथ डोळे, चंद्रकांत डोळे, गोकुळ भाऊ वाणी,संजय वाघमारे, शरद वाणी, सुरेश भाऊ नागरे, बाळासाहेब चौधरी, कृषी सहाय्यक सचिन गायकवाड कामगार तलाठी सौ मंगल सांगळे, कामगार तलाठी मुतोडे मॅडम, ग्रामसेवक मनीषा शिंदे व शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here