बँका सुदृढ ठेवण्यासाठी योग्य कर्ज वसुली व्यवस्थापन गरजेचे – सत्येन मुंदडा 

0

कोपरगाव : शनिवार रोजी अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी कर्ज वसुली व्यवस्थापन या विषयावर हॉटेल टेम्पल ट्री, शिर्डी येथे ज्ञानसत्राचे आयोजन केले होते  या ज्ञानसत्रात जिल्ह्यातील 20 बँकांचे एकूण 45 प्रतिनिधी उपस्थित होते.  पुणे येथील कर्ज वसुली व्यवस्थापन तज्ञ राजेश यादव सर हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते व जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे विश्वस्त माधवराव देशमुख व वसंतराव आव्हाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते

या ज्ञानसत्राच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँक असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी बँक आर्थिक दृष्ट्या सुदृढ व सक्षम ठेवण्यासाठी कर्ज वसुलीचे योग्य नियोजन करणे खूप आवश्यक आहे असे सांगितले. कर्ज खाते थकीत होणार नाही व कायद्याच्या चौकटीत राहून कर्ज वसुली करून आपल्या बँकेचा फायदा करून द्यावा असे आवाहन  उपस्थित बँकेच्या प्रतिनिधींना केले

प्रमुख पाहुणे माधवराव देशमुख यांनी बँकेच्या प्रगती करिता बँकेचे कर्जदार , अधिकारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये विश्वास व उत्तम समन्वय असणे खूप आवश्यक आहे असे सांगितले.

प्रशिक्षक राजेश यादव यांनी अतिशय सोप्या भाषेत कर्ज खाते कसे थकणार नाही व कर्ज देताना घ्यावयाची काळजी , करावयाचे करार, तसेच कर्ज वसुलीचे विविध कायदे व उपलब्ध पर्याय याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. या ज्ञानसत्रामध्ये सर्व सहभागी बँक अधिकाऱ्यांना  प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आल याप्रसंगी ज्ञानसत्राचे समन्वयक बारामती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी श्री नवनाथ जगताप, असोसिएशनचे श्री काकडे व  सौ पूनम बुरा यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारनवनाथ जगताप यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here