बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवले

0

संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील अफसर तांबोळी यांच्या मालकीच्या दोन मजली बंद घराचे  कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदरची  घटना मंगळवारी घडली.

          याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील अफसर तांबोळी हे गावाला गेलेले होते, याच संधीचा अज्ञात चोरट्याने फायदा साधत त्यांच्या बंद दोन मजली बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले बारा हजार रुपये रोख व ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीची ह्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देत पाहणी केली आणि अहमदनगर येथून श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. याबाबत अफसर तांबोळी यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here