पिक विमा व सरकारच्या मदत मिळालीच नाही
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे :
कष्ठावीना पर्याय नाही शेतीला, आणि बैला शिवाय पर्याय नाही काळ्या मातीला बळीराजाचा सच्चा मिञाचा बैल पोळा माञ यावर्षी दुष्काळा सावटा खाली साजरा करावा लागला आहे.दुष्काळ असल्याने बळीराजाचा सच्चा मिञ बैल पोळा साजरा करताना काटकसरीत करावा लागला.यावर्षी बाजारपेठेत बैलासाठी साजशृंगारची दुकानेही कमी प्रमाणात दिसत होती. दुष्काळाचा परीणाम व्यापारीपेठेवर दिसून आला आहे.अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाचे पैसे हि झाले नाहीत.अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे दुष्काळाच्या सावटाखाली पोळा साजरा करण्यात आला.
देवळाली प्रवरा बाजारतळावरील शेतकरी पुतळ्यास बैल पोळ्या निमित्त ह.भ.प.मुकुंद चव्हाण, ह.भ.प. दुर्गाप्रसाद तिडके, कांता पा.कदम गोविंद टिक्कल, रामभाऊ अटक,बापू कडू,नानासाहेब शिरसाठ आदींनी पुष्पहार अर्पण केला.
गेल्या जुन महिण्यापासुन शेतकरी राजा पावसाची वाट पाहत आहे.थोड्याशा रिमझिम पावसावर सोयाबिन व कापसाची लागवड केली होती.परंतू निसर्गराजाने पाठ फिरविल्याने ते हि पिके जळून गेली.घरातील थोडीफार असलेली पुंजी पिकासाठी वापरली. येणाऱ्या पिकाच्या आशेवर बळीराजा होता.परंतू सगळीकडेच निसर्गाने पाठफिरविल्याने बळीराजाला सच्चा मिञाचा बैल पोळा माञ यावर्षी दुष्काळा सावटा खाली साजरा करावा लागला आहे.
राज्य सरकारने एक रुपायात पिक विमा योजना राबविली परंतू अद्यापही पिक विमा योजने कडून भरपाई मिळाली नाही.सरकारने पिक पाहणी करुन दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.बळीराजाच्या हातातील निसर्गाने पिक ही हिरावून नेले.ना सरकार मदतीला आले ना पिक विमा मदतीला आला.बळीराजाने खाजगी सावकाराकडून कर्ज काढुन बळीराजाचा सच्चा मिञाचा बैल पोळा साजरा केला.परंतू तो दुष्काळाच्या सावटाखाली.वर्षातील एकच बळीराजाचा सण असतो तो हि मनासारखा साजरा करता आला नसल्याची खंत शेतकऱ्यांने बोलून दाखवत असताना डोळे भरुन आले होते.