बाजार समितीच्या निवडणुकीत एकमेकांवर तोफा डागल्या

0

निर्सगराजाने माञ बाजार समितीच्या निवडणुकीतील एकमेकांच्या विरोधकांना एका छताखाली आणले!

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे  :

                 आवकाळी पाऊस तसा शेतकऱ्यांसाठी  तोट्याचा असला तरी राहुरीच्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माञ दोन्ही पक्षांना(एकमेकांना विरोधक समजणारे) एकञ आणणारा ठरला आहे.मतदान केंद्राबाहेरील मतदानाच्या सुचना फलकाच्या फ्लेक्सचा आधार घेवुन दोन्ही पक्षांचे नेते, उमेदवार  व कार्यकर्त्यांनी पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी एकञ आधार घेत एकाच छताखाली विरोधक आल्याचे राहुरीत पाहण्यास मिळाले आहे.

              राहुरी तालुक्यात बुधवार पासुन हवामानाच्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.तालुक्याच्या अनेक भागात वादळाने होत्याचे नव्हते केले आहे.बाजार तसमितीच्या निवडणुकीतील प्रचारामुळे आरोप प्रत्यारोपाच्या तोफा डागल्याने वातावरण तापले होते.शुक्रवारी बाजार समितीचे मतदान प्रक्रीया स्व.रामदास पाटील धुमाळ कला शास्ञ व वाणिज्य महाविद्यालयात सुरु होती.बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे प्रवेशद्वारा शेजारील झाडे उमळून पडले आहेत. शुक्रवारी सकाळी मतदान प्रक्रीया सुरु असताना अचानक आभाळात पाऊसाचे काळेकुट्ट ढग जमा झाले.सकाळी 11 वा वादळीवाऱ्यासह पाऊस सुरु झाला.त्यापुर्वी मतदारांना नमस्कार चमत्कार करण्यासाठी महाविकास आघाडी तथा जनसेवा मंडळाच्या वतीने सभापती अरुण तनपुरे,माजी खा.प्रसाद तनपुरे आ.प्राजक्त तनपुरे, उमेदवार  तर भाजपा तथा विकास मंडळाच्या वतीने माजी आ.चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व उमेदवार आदी उपस्थित होते.

         अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पाऊसामुळे आल्याने मतदारांसह उमेदवार आणि निवडणूक यंत्रणेची ञेधापीट उडाली . मतदार , विशेषतः महिला मतदार , उमेदवार , अधिकाऱ्यांना अक्षरशः मतदान व मतमोजणीपूर्वीच मतमोजणी केंद्राचा आधार घ्यावा लागला. हा प्रकार राहुरी कॉलेज मतदान केंद्रावर पहावयास मिळाला. मतदान प्रक्रिया नियोजन करताना निवडणूक अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक पाऊस येऊ शकतो ! हे लक्षात घेऊन खबरदारी घेणे आवश्यक होते.परंतू तशी कोणतीही दक्षता निवडणुक निर्णय अधिकारी यांनी घेतली नाही.त्यामुळे नेते,उमेदवार व कार्यकर्ते मतदार यांना मिळेल तेथे आसरा घ्यावा लागला.याबाबत मतदारांनी माञ तीव्र नाराजी व्यक्त केली. 

             बाजार समितीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी निसर्गाने माञअवकाळी रुपाने वादळीवाऱ्यासह पाऊसाची तोफ डागल्याने निवडणुकीत एकमेकांवर तोफा डागणारे माञ स्वतःचा बचाव करण्यासाठी फ्लेक्सच्या छताखाली एकञ आल्याचे राहुरी बाजार समितीच्या मतदान प्रक्रीयाच्या ठिकाणी दिसुन आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here