बारगाव नांदुरकरांनी जावईची धिंड काढली

0

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे 

          बारागाव नांदूर गावात कोरोना काळात बंद पडलेल्या प्रथेला पुन्हा सुरु करुन अखेर  बारागाव नांदुरचा जावईबापू राजेंद्र कांदळकर हे ग्रामस्थांच्या हाती लागले. गाढवावरून धिंड काढत जावई कांदळकर यांचा मान सन्मान करीत गावाची प्रथा जपण्यात आली.कांदळकर हे राहुरीच्या खरेदी विक्रीच्या दुय्यम निंबधक कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत आहे.

                   राहुरी तहसिल कार्यालयातील दुय्यम निंबधक कार्यालयातील राजेंद्र कांदळकर हे बारागाव नांदूर येथील रखमाजी वाघ यांचे जावई आहेत. ते बारागाव नांदूर येथे मुळा धरणाच्या तटालगत राहतात. कांदळकर यांना मित्र व नातलग रियाज इनामदार, राजेंद्र वाघ, लक्ष्मण वाघ, शरद वाघ, शिवाजी भालेराव, नानासाहेब देवकर, जयमल्हार मित्रमंडळाचे बाळासाहेब भालेराव, डॉ. अनिल पवार, अर्जुन पवार, आप्पासाहेब देशमुख, स्वप्नील खामकर, गणेश देवकर, महेश कोहकडे, भारत देवकर, शुभम देवकर, सागर कांदळकर, नवनाथ वाघ यांनी पकडून आणले. त्यांच्या अंगावर रंगाची उधळण केली. गाढवावर बसून त्यांची धिंड काढण्यात आली. मुळा धरण तटालगत कांदळकर यांची सुरू झालेली धिंड सासरे रखमाजी व लक्ष्मण वाघ यांच्या घरी गेली. सासरे बुवांनी जावयाचा मानपान व सन्मान दिला. जावई बापुला नवीन कपडे, पंच पक्वान्न देत मानपान देण्यात आला.

बारागाव नांदूर गावाने गेल्या ५० वर्षांपासून जावई बापुच्या धिंडीची प्रथा जपली आहे. मागिल कोरोना कालखंडात ही प्रथा बंद पडली होती. परंतु गावातील तरूणांनी या प्रथेला फाटा न पडू न देता वाघ यांचे जावई कांदळकर यांना अखेर शोधलेच. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here