शेवगाव — ( जयप्रकाश बागडे ) —-
बालमटाकळी ते श्रीक्षेत्र शिर्डी साईबाबा पायी पालखी मध्ये सहभाग घेणाऱ्या भाविकांचे बालमटाकळी येथे पालखीची सांगता समारोहात साईधाम मधील साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संतोषशेठ बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र देवा जोशी यांनी पालखीत सहभाग घेणाऱ्या पुरुष व महिला भगिनींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील साईधाममधील साईबाबा मंदिराचे संस्थापक अध्यक्ष संतोषशेठ बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र देवा जोशी यांच्या नेतृत्वाखाली बालमटाकळी ते शिर्डी साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते , येथील साई बाबा मंदिरात संतोषशेठ बोथरा व ताराचंद दादा शिंदे यांच्या हस्ते साईबाबा प्रतिमेचे व पालखीचे पूजन होऊन पालखीचे 25 फेब्रुवारीला प्रस्थान झाले होते ,150 किलोमीटरच्या आणि 6 दिवसाच्या शिर्डी पायी प्रवासात अबाल वृद्ध, महिलांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला होता व पालखी सोहळ्याला ज्या श्रद्धांळूनी सहकार्य केले, त्यांचे बालमटाकळी येथील साईधामच्या साईबाबा मंदिरात सांगता सोहळ्यात पुरुषांना शाल श्रीफळ व महिलांना साडी चोळी भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान करून साई दरबारी अन्नदान करण्यात आले ,
पालखी सोहळ्यात हैदराबादचे संपतजी व्यास , प्रवीण देवा जोशी , पंकज बिवरे ,दादा लोणकर ,भक्ती जोशी ,मैनाबाई पलाटे ,गोदावरी महानोर ,दुर्गेश परदेशी, पांडू ढोले, विजू सोनवणे, रामजी पाथरकर , छोटू परदेशी ,गणेश सोनवणे ,सुरेश म्हस्के , ओम जोशी ,पार्थ पब्लिक स्कूलचे भरत देशमुख सर ,रमेश टोके , शहादेव महानोर ,राजेंद्र क्षीरसागर , अविनाश पाथरकर, सागर पाटेकर ,संतोष घुले, दादासाहेब जांभळे, आदी साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता ,