वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बिबट्याला गमवावा लागला जीव ?
कोपरगाव ; कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीतील गोदावरी नदी लगत असलेल्या शेतकरी अमोल दौंड यांच्या चिकूच्या बागेतील विहिरीमध्ये बिबट्या भक्ष शोधत असताना पडला. मात्र सुरवातीला बिबट्या पडल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. शेतकरी अमोल दौंड हे शेतावर चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळून आला. त्यांनी पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांना त्वरित संपर्क साधून विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती दिली . गायकवाड यांनीही तात्काळ याची खबर वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना मोबाईल वरून कळवली . मात्र त्वरित कारवाई करतील ते सरकारी अधिकारी कसे . वनाधिकारी श्रीमती सोनावणे यांना २५ सप्टेंबर रोजी माहिती मिळूनही अद्यापपर्यंत तरी हा मृत बिबट्या विहिरीतून काढण्याची कारवाई केली नाही .
आज आमच्या प्रतिनिधीने घटना स्थळास भेट दिली असता सदर बिबट्याचे शव कुजून संपूर्ण परिसरात दुर्गंधी सुटली आहे. बिबट्या सारखा वर्ग एकचा वन्यप्राणी नेमका कशामुळे मृत झाला याची माहिती कळणे आवशक असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले ? तसेच बिबट्याच्या कुजलेला मृतदेहामुळे संबधित शेतकऱ्याच्या विहिरीचे पाणी दुषित झाले असून दुर्गंधीमुळे ग्रामस्थांना त्रास होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत उद्यापर्यंत कारवाई न केल्यास आम्ही राज्याच्या वनमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनीदिला आहे.
कोपरगाव तालुक्यामध्ये दिवसेंदिवस जंगलातील वन्य प्राणी हे लोक वस्तीमध्ये येत असून भक्ष्याच्या शोधामध्ये ते वन वन फिरत असतात अशाच अवस्थेमध्ये जेऊर कुंभारी गावांमध्ये गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या या दौंड यांच्या शेतातील विहिरीमध्ये बिबट्या मृत अवस्थेमध्ये दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वीही या परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता या बिबट्याचा बंदोबस्त करावा याकरिता वनविभागाला कळविण्यात आले होते परंतु वन विभागाच्या अधिकारी पन्नास फोन करूनही कधी फोन उचलत नाही नागरिकांना कधी दात देत नाही या ठिकाणी पिंजरा लावलेला असता तर बिबट्या विहिरीत पडला नसता त्यामुळे बिबट्या विहिरीमध्ये पडला व तो मृत होऊन काही दिवसानंतर तो शेतकऱ्याला दिसल्यामुळे वन विभागाचे अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड त्यांनी सांगितले असून सदर बिबट्याची विल्हेवाट लावण्यासाठी ही वनाधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. तरी तात्काळ वन विभागाने त्या बिबट्या विहिरीतून काढून नागरिकांना दुर्गंधी मुक्त करून त्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी होत आहे.