विवेकभैय्या कोल्हे चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचे पारितोषक वितरण संपन्न
कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगांव चेस व स्पोर्टस् क्लब आयोजित युवानेते विवेकभैय्या कोल्हे चषक, राज्यस्तरीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ठ आयोजन करून संयोजन समितीने खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.युवा पिढीच्या प्रगतीसाठी सर्वोतपरी साथ देण्याची भूमिका कोल्हे यांनी ठेवल्याने चांगले व्यासपीठ खेळाडूंना मिळाले आहे.या स्पर्धेचे पारितोषिक वितरण १ सप्टेंबर रोजी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी राज्याचे प्रतिनिधित्व देश आणि जागतिक पातळीवर कोपरगावमधून व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी नोंदणी झाली होती यामध्ये सुमारे ७०० स्पर्धक सहभागी झाले होते.वय वर्षे ५ ते ६० वर्षाच्या देखील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रिय असणारा बुद्धिबळ खेळ विद्यार्थ्याचे सर्वांगीण विकासाला फायदेशीर आहे.बौद्धिक चपळता आणि संयम असा दोहोंचा मिलाफ या खेळात घडून येतो.जगात साधारण ६० कोटीपेक्षा अधिक लोक बुद्धिबळ खेळतात असे मनोगत व्यक्त केले.
विविध प्रकारच्या स्पर्धांमधून संधी उपलब्ध करून दिल्यास दर्जेदार खेळाडू ग्रामीण भागातून घडतात.जागतिक पातळीवर आपले नावलौकिक करणारे ग्रँडमास्टर भारतात घडतात.शेकडो वर्षांचा इतिहास असणारा बुद्धिबळाचा पट ज्याला जिंकता आला त्याला अनेक कठीण प्रसंगांना सहज सामोरे जाण्याची कला देखील अवगत होते.भविष्यात या स्पर्धेसाठी अधिक सहकार्य असेल.आपल्या भागातून ग्रँडमास्टर घडावे यासाठी कोपरगाव चेस क्लब अतिशय चांगले काम करत असून त्यांनी खेळाचे महत्व जोपासले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
यावेळी कोपरगाव चेस क्लबचे संस्थापक नितीन सोळके , वैजापूरचे मा.नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती,विशाल संचेती,जिवन संचेती,अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान साहेब,कारखाना व्हा.चेअरमन मनेश गाडे,डॉ.प्रितम जपे,डॉ.मयुर जोर्वेकर,राकेश काले, जिल्हास्तरीयआदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त प्राचार्य राजेंद्र पानसरे,राम थोरे,प्रतिक भावसार,महर्षी विद्यामंदिरचे क्रिडा शिक्षक शिवप्रसाद घोडके,पंच गुरुजित सिंग,पंच सागर गांधी,प्रमोद वाणी,संकेत गाडे,महेश थोरात,राजेंद्र कोळपकर,राजेंद्र कोहकडे,रंजय त्रिभुवन,उदय देशपांडे,सुमित गुप्ता,रमेश येवले,किरण कुलकर्णी,अतुल शालीग्राम,शिवप्रसाद काळे,जसविंदर सिंग आदींसह स्पर्धा संयोजन समिती सदस्य,स्पर्धक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.