बोल्हेगांव रस्त्याचे अर्धवट काम तातडीने पुर्ण करण्यासाठी खा.सुजय विखेना साकडे

0

अहमदनगर – बोल्हेगांव-नागापूर परिसरातील रखडलेले अर्धवट रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय कातोरे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांना दिले. याप्रसंगी पोपट पाखरे, अक्षय तागें, अंकुश सप्रे, अतुल पाखरे, हरिभाऊ तेलोरे, राहुल गावडे आदि उपस्थित होते.

     निवेदनात म्हटले आहे की, बोल्हेगांव-नागापुर परिसरातील प्रभाग क्र.7 मधील गणेश चौक ते कातोरे वस्ती ते केशव कॉर्नर रास्त्याचे काम बर्‍याच महिन्यांपासून सुरु आहे. हे काम संथ गतीने सुरु असून, रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवल्यामुळे नागरिकांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहे. संबंधित ठेकेदार, प्रशासनाचे कामात कुचराई होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत नाही. या रस्त्याच्या कामामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी नागरिकांची या त्रासापासून सुटका करावी. या रस्त्यांच्या कामाबाबत प्रशासनाला व महानगरपालिकेला पुढील कामाचे आदेश देऊन रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here