ब्राह्मण समाजाची भुमिका नेहमीच सर्वाना बरोबर घेवुन जाण्याची : लावर गुरुजी

0

ब्राह्मण सभा कोपरगांवच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहाने संपन्न

कोपरगांव प्रतिनिधी –

दरवर्षी प्रमाणे आठ वर्षा पासुन सुरु असलेली ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहाने संपन्न झाला. राहता येथील वे.शा.सं.अनंत शास्त्री लावर गुरुजी,वे.शा.सं.सुरेश जोशी गुरुजी,वे.शा.सं.मकरंद लावर गुरुजी यांचे हस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना अनंत शास्त्री लावर म्हणाले की ब्राह्मण समाजाची भुमिका नेहमी सर्वाना बरोबर घेवुन जाण्याची असते.इतरांच्या तुलनेत भारतीय कालगणना दर्शक दिनदर्शिका खुप प्राचिन व परिपूर्ण आहे.ही कालगणना सर्व समावेशक आहे.इतर धर्म,पंथाचे दिनविशेष देखिल यात दर्शविले जातात.म्हणुन ती सर्वाकडे असणे गरजेचे आहे.या वेळी त्यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा गौरव करून  पुढील उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनी लवकरच कार्यालय समाजाला वापरण्या साठी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी दिनदर्शिका जाहिरात व देणगिदार यांचा उपस्थित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  ब्राह्मण सभेचे अध्यक्ष  मकरंद कोऱ्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ  नागरीक मंचचे दत्तोपंत कंगले होते. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,सुरेश जोशी गुरुजी,मकरंद लावर गुरुजी,सामाजिक कार्यकर्ते शामराव क्षीरसागर,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,पिपल्स बॅकेचे संचालक अनिल कंगले,दत्तात्रय ठोंबरे उपस्थित होते.

या वेळी उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी, सचिव सचिन महाजन,सह सचिव संदीप देशपांडे, माजी अध्यक्ष श्री. वसंतराव ठोंबरे, श्री संजीव देशपांडे, संघटक महेंद्र कुलकर्णी,योगेश कुलकर्णी,ब्राह्मण समाज महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ.श्रध्दा जवाद,वंदना चिकटे,शैला लावर, स्वाती मुळे,शामल कुलकर्णी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार खजिनदार जयेश बडवे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here