भंगार चोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप सह पाच चोरट्यांना पोलिसांनी पकडले

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 संगमनेर येथून चोरलेल्या पिकअपमध्ये देवळाली प्रवरा (ता.राहुरी) येथून तांबे व पितळाचे भंगार चोरून भरधाव वेगाने जात असताना पाच चोरट्यांना राहुरी फँक्टरी अटक करण्यात crime branch plice गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपींकडून आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

               जैद मुश्ताक सय्यद (वय १९), उमर बशीर शेख (वय २१, दोघे रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), मुजम्मिल मन्सूर शेख (वय २२, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर), नजीर रज्जाक सय्यद (वय २४, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी), सोहेल इब्राहिम पठाण (वय १९, रा. नांदूररोड, ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपींची  नावे आहेत.

             आरोपींनी संगमनेर येथून पिकअप चोरली. त्यानंतर ते राहुरी  तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल युनूस स्क्रॅप सेंटरमधून त्यांनी तांबे व पितळाचे भंगार चोरले. चोरीचे भंगार पिकअपमध्ये भरून ते राहुरीच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. त्याचवेळी गुन्हे शाखेचे एक पथक श्रीरामपूरच्या दिशेने जात होते. पोलिसांना संशय आला. त्यांनी पिकअपचा पाठलाग करत चालकाला थांबण्याचा इशारा केला. चालकाने पिकअप थांबविली. पिकअपची झडती घेतली असता तांबे व पितळाचे भंगार दिसून आले. पिकअपच्या कागदपत्रांबाबत विचारपूस करताच चोरटे गडबडले. पिकअपमधील पाचही आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी संगमनेर येथून पिकअप चोरून देवळाली प्रवरा येथून भंगार चोरल्याची कबुली दिली. 

            स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील सहायक फौजदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी,रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, रणजित जाधव, जालिंदर माने आदींच्या पथकाने केली.

देवळाली प्रवरातील चहावाल्याच्या हाँटेल मधुन चारजण ताब्यात घेतलेले कोण? पोलिसांचे गौडबंगाल काय ?

                   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राञीच्या गस्तीच्या वेळी पिकअप सह पाच जणांना ताब्यात घेतल्याचे सांगत आहे.पिकअप  आणि तांबे व पितळ चोरीच्या गुन्ह्यात देवळाली प्रवरा येथिल एका चहा वाल्याच्या हाँटेलच्या पाठीमागच्या रुम मध्ये बसलेल्या त्या चौघांना ताब्यात घेतले.एकाच गुन्ह्यात राञी आणि दिवसा असे चार आरोपी अटक केले तर पोलिसांच्या ताब्यात राञी गस्तीवर असताना पाच आरोपी ताब्यात घेतले आहे.तर देवळाली प्रवरातून याच गुन्ह्यासाठी चार आरोपींना अटक त्यांचे काय ? पिकअप सोडून पळून गेलेल्या पाच आरोपी पैकी चार आरोपींना ताब्यात घेवून गस्तीवर असतानाच ताब्यात घेतल्याचे दाखवले की काय ?त्या चार आरोपींना देवळाली प्रवरातून ताब्यात घेताना काकासाहेब चौकातील सीसीटिव्ही कँमेऱ्यात पोलिसांसह आरोपी कैद झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here