भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठान  ‘युवा प्रबोधना’स उत्स्फुर्त प्रतिसाद

0

कृतीशिल उपक्रमातून ग्रामीण भागाच्या विकासास खर्‍या अर्थाने चालना मिळेल – प्रा.गणेश शिंदे

     नगर –    आजच माणुसकी हा शब्दच दुर्मिळ होत चालला आहे, परंतु ग्रामिण भागात अजूनही एकमेकांविषयी आदरभाव व्यक्त होत आहे, ही दिलासा दायक बाब आहे. परंतु राजकारण आडवे येते, तेव्हा युवकांनी अगोदर स्वत:, कुटूंब सक्षम केल्यानंतरच राजकारणाचा विचार करावा. आज शेती उद्योगात अनेक संधी आहेत, आधुनिक शेती केल्यास ती फायद्यातही होवू शकते हे आज अनेक उच्चशिक्षित तरुणांनी दाखवू दिले आहे. आज मोबाईलवर तुम्हाला शेतीच्या आधुनिक पद्धतीत, हवामानाचा अंदाज, देशातील बाजार पेठा, उत्पादित मालाचे भाव, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, अनुदान, विमा अशा असंख्य गोष्टी तुम्हाच्या हातात आहेत. तसेच युवकांना नोकरीच्याही अनेक संधी आहेत. 8 वी ते उच्च शिक्षित तरुणांसाठी विविध बेबसाईटवर पाहिजेतच्या सरकारी, निमसरकारी, खाजगी, कंपन्यांच्या जाहिराती आहेत. ऑनलाईन पद्धतीने आपले सिलेक्शन होऊ शकते.  परंतु आपण मोबाईल भलेतेच पाहण्यात वेळ घालवतो अन् दुसर्‍याच्या नावे खडे फोडतो. कष्टकरण्याची तयारी ठेवा, आपल्यातील क्षमतांचा विचार करुन त्यादृष्टीने मार्गक्रमण केल्यास आपण नक्कीच यशस्वी व्हाल. भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठान करीत असलेल्या कृतीशिल उपक्रमातून आपल्या भागाच्या विकासास खर्‍या अर्थाने चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन, व्याख्याते गणेश शिंदे यांनी दिला.

     सारोळा कासार येथील भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेच्यावतीने झुंजार नेते भाऊसाहेब कडूस पाटील यांच्या द्वितीय जयंतीनिमित्त ‘युवा प्रबोधन’ हा कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता.  प्रसिद्ध व्याख्यानकार गणेश शिंदे पाटील यांचे व्याख्यान झाले. आमदार निलेश लंके यांचे बंधु दिपक लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मंगल ताई कडूस पाटील, सचिव महेश कडूस पाटील, लतीफ शेख, विठ्ठल काळे पाटील आदी उपस्थित होते.

     दिपक लंके यांनी आमदार निलेश लंके यांनी प्रतिष्ठान स्थापन केलेल्या आठवणींना उजाळा देत प्रतिष्ठानच्या माध्यमातून किती मोठे काम होऊ शकते या संदर्भात मोहटा देवी दर्शनाचा दाखला देत, सध्याच्या भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठानच्या कामांचे कौतुक केले.

     प्रास्तविकात महेश कडूस म्हणाले, भाऊसाहेब कडूस पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकरी, युवक, महिला यांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. आपल्या परिसराचा विकास व्हावा, येथील उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, नवउद्योजक निर्माण व्हावेत, तसेच युवकांना त्यांच्या क्षमतानुसार कोणत्या क्षेत्रात संधी आहेत, यासाठी या ‘युवा प्रबोधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मिळालेला प्रतिसाद पाहता यापुढेही असेच कार्यक्रम राबविण्यात येतील, असे सांगून 12 जून रोजी परिवर्तन चळवळीचा स्थापना दिवस असल्याने प्रतिष्ठानची सदस्य नोंदणी जून महिन्यात सुरू होणार असल्याचे सांगितले.

     उद्योजक शुभम कडूस पाटील, राहुल कडूस पाटील, निखिल धामणे पाटील, गणेश कडूस पाटील, प्रणय संचेती, आमीर शेख आदी नव तरूण उद्योजक व विजय साळवे यांच्यासह कुस्तीपटूं चे सत्कार गणेश शिंदे पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास युवकांसह पंचक्रोशितील नागरिकांनी उपस्थितीत राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here