भाग्योदय माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0

आत्मनिर्भर भारताचा स्वप्न पाहत असताना निरोगी जीवनासाठी योगाभ्यास महत्त्वाचा – प्राचार्य ज्ञानदेव बेरड

     नगर – 21 जून आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योगदिन  केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र शेळके व योग प्रशिक्षक प्राचार्य ज्ञानदेव बेरड, डॉ. कदम सर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले एकविसाव्या शतकात आत्मनिर्भर भारताचा स्वप्न पाहत असताना निरोगी जीवनासाठी योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. आरोग्यदायी जीवनशैली तसेच चांगले जीवन जगण्यासाठी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे. बदलती जीवनशैली आणि वेगवान वाढलेले जीवनमान यामध्ये काम करण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. सर्वांनी योग करावा. योगाचा सर्वांना लाभ होत असल्याने योग हा सर्वांनी करावा यामध्ये बालक, तरुण, वृद्धांचा समवेश असावा. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून योगाचा स्विकार करावा असे सांगून प्रात्यक्षिक व योगाचे महत्त्व सांगितले.

     याप्रसंगी राजेंद्र शेळके यांनी उत्कृष्ट योग प्रात्यक्षिक आसन प्राणायाम विद्यार्थ्यांना करून दाखवले तसेच हास्य मुद्रा करून विद्यार्थ्यांना खूप मोठ मोठ्याने हसवले. गोविंद कदम यांनी विद्यार्थ्यांना योगापूर हालचाली, शयन स्थितीतील आसने, तसेच विपरीत शयन स्थितीतील असने, प्राणायाम व योग प्रार्थन गुरुवंदना करून योगाचे संपूर्ण माहिती आपल्या प्रास्ताविकात सांगितली.

       कार्यक्रमांमध्ये पोपटराव येवले, साहेबराव कार्ले, सोपानराव तोडमल, बाबासाहेब कोतकर, संतोष काकडे, धनंजय बारगळ, आदिनाथ ठुबे, गोरक्ष खांडेकर, दत्तात्रय पांडुळे, शिंदे रूपाली तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला.  शिक्षक  एकनाथ होले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here