माजी आ.चंद्रशेखर कदम मुलाच्या निर्णयाशी सहमत
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
भाजपाने राहुरी पाथर्डी विधानसभा मतदार संघात माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणुक लढविण्याचा अग्रह धरला आहे.अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव भाजपा विरोधात बंडाचे निशान फडकवून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या आडुन सत्यजित कदम यांनी पञकार परिषदेत जाहिर केले आहे.माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी ही भाजपात प्रामाणिक कार्यकर्त्यास जर किमंत नाही. त्यामुळे पक्षाच्या विरोधात मुलाच्या निवडणुकीसाठी बंड करणार असल्याचे माजी आ.चंद्रशेखर कदम यांनीही याच पञकार परिषदेत जाहिर केले आहे.
राहुरी पाथर्डी मतदार विधानसभा मतदार संघात भाजपाने पुन्हा शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी जाहिर केली आहे.सलग दुसऱ्या पंचवार्षिकेत उमेदवारीचे दावेदार असणारे सत्यजित कदम यांना उमेदवारी नाकारली असल्याने या मतदार संघातील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सत्यजित कदम यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा अग्रह धरला आहे.मला नेता बनवणारे माझे कार्यकर्ते जर विधानसभा लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा मान राखावा लागेल असे कदम यांनी सांगितले.
सत्यजित कदम यांनी पञकारांशी बोलताना सांगितले की,पक्षाच्या प्रमुख नेत्यांना मला विधानसभा लढवायची आहे.याची कल्पना दिलेली होती.परंतू पक्षाने माझा विचार केला नाही.त्यामुळे वेगळा विचार करावा लागत आहे.कार्यकर्त्यांशी चर्चा दोन दिवसात निर्णय जाहिर केला जाईल असे म्हटले असले तरी अप्रत्यक्ष रित्या अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे बोलण्यातुन जाणवत होते.उमेदवारी मिळविण्यासाठी जे राजकारण होते तेथे मी कमी पडलो आहे.
उमेदवारी मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केले का?आसे विचारले असता उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न झाले असतील.परंतू माझी उमेदवारी नाकारल्याने पक्षाला निश्चित तोटा होईल.पक्षाने चेहरे बदलायचे ठरवले होते.माझी तिसरी पिढी भाजपात काम करते आहे.एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणुन तिकीट मिळाले पाहिजे होते.पराभव झालेल्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही.असे आसतानाही माझी उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव निर्णय घेणे भाग पडत आहे.
माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी पञकार परिषेदत सांगितले की,गेल्या तीन पिढ्या पासुन स्वयंसेवक आहे.सुर्यभान वहाडणे यांच्यामुळे मला विधानसभेचे तिकीट मिळाले होते.मी माझे तिकीट माजी आ.शिवाजीराव कर्डीले यांना मोठ्या मनाने दिले होते.त्याचा मान राखुन यावेळेस तरी कर्डीले यांनी सत्यजित कदम साठी थांबले पाहिजे होते.भाजप जर एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विचार करत नसेल तर मुलासाठी मला हि वेगळा विचार करावा लागेल.पक्षात घुसमट होतेय.भाजपा वेगळा विचार करतेय त्यामुळे आम्हालाही वेगळा विचार कृरणे भाग पडत आहे.असे माजी आ.कदम यांनी सांगितले
यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,सचिन ढुस, अजिज चव्हाण,सचिन शेटे,सतिष वणे,संतोष चव्हाण,रामेश्वर तोडमल,राजेंद्र चव्हाण,बाळासाहेब मुसमाडे ,सुधीर टिक्कल,सुभाष पठारे,प्रविण देशमुख,शुभम मोटे,रोहित वाबळे,सोमनाथ शिपणकर,सागर मोटे,तुषार कदम आदी उपस्थित होते.
.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवळाली प्रवरात संचलन संपताच माजी आ. चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पञकार परिषद घेवून बंडाचे निशान फडकवले आहे.सत्यजित कदम हे संघाच्या गणवेशातच पञकार परिषदेसाठी आले होते.पक्षाच्या विरोधात जरी बंड केला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कायम राहणार आहे.असे चंद्रशेखर व सत्यजित कदम यांनी सांगितले.