जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी अल्पसंख्यक चे जिल्हा अध्यक्ष तैय्यब बेग यांनी निवड केली असून या निवडीचे पत्र माजी मंत्री आ. प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. पक्षाच्या ध्येय धोरण लक्षात घेऊन अल्पसंख्यांक समाजातील अडी अडचणी सोडवण्यासाठी काम करणार असून पक्ष वाढीसाठी जामखेड तालुका सह जिल्हयात मोठे संघटन करणार तसेच गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, अंध अंपग यांचे काय शासन दरबारी काम असेल ते सोडविण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे .
यावेळी जिल्हा परीषद सदस्य अशोक खेडकर, काकासाहेब धांडे, भिमराव गायकवाड,भागवत जगदाळे , बाबासाहेब बामणे, खालेद पठाण ,सिद्दीक शेख, मुजाहीद पठाण, रमजान सय्यद, अरबाज सय्यद, आनिस पठाण,जैद पठाण उपस्थित होते. या निवडीबद्दल तालुका अध्यक्ष जमीर बारूद, शहराध्यक्ष प्रा.जाकीर शेख आदींनी अभिनंदन केले. अल्पसंख्यक चे जिल्हा अध्यक्ष तैय्यब बेग यांनी निवड केली