कोपरगाव : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून ४ सप्टेंबरपासून ‘शिव-शक्ती परिक्रमा’ सुरू केली आहे. त्यानिमित्त त्या सोमवारी कोपरगाव येथे आल्या असता त्यांनी कोल्हे वस्ती (येसगाव) येथील माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोल्हे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा श्री साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
‘शिव-शक्ती परिक्रमा’ साठी कोपरगावला आलेल्या भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी कोपरगाव बेट भागातील दैत्यगुरू श्री शुक्राचार्य मंदिरास माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या समवेत भेट देऊन श्री शुक्राचार्य महाराजांचे दर्शन घेऊन माध्यान्ह आरती केली. त्यानंतर त्यांनी स्नेहलताताई कोल्हे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी श्रीमती सिंधुताई (माई) कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पंकजाताई मुंडे यांनी यांचे स्वागत केले.
पंकजाताई मुंडे यांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण केली. तसेच स्व. कोल्हेसाहेबांच्या पत्नी श्रीमती सिंधुताई (माई) कोल्हे यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून कोल्हे कुटुंबीयांशी हितगुज साधले. स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या कार्याला उजाळा देताना त्या म्हणाल्या, स्व. शंकरराव कोल्हे साहेब व स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या दोन्ही नेत्यांनी कष्टकरी शेतकरी, कामगार, वंचित, शोषित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडून ते प्रश्न सोडविण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्व. कोल्हेसाहेबांनी स्व. मुंडेसाहेबांना अनमोल सहकार्य केले. आजही कोल्हे व मुंडे कुटुंबीयांमध्ये ऋणानुबंध कायम आहेत. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व मी विधानसभेत सहकारी होतो. आम्ही दोघी एका ताटात जेवण करायचो. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याशी आपले मैत्रीचे संबंध आहेत.
पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री असताना कोपरगाव पंचायत समितीसाठी ५ कोटी रुपये दिले होते. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात पंकजाताईमुळे कोपरगाव मतदारसंघातील अनेक विकास कामे पूर्ण करता आली, असे सांगून स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी कलावतीताई कोल्हे, नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृताताई पवार, ईशानभैय्या कोल्हे, रेणुकाताई कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे व कुटुंबातील सर्व सदस्य, राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे सदस्य प्रवीण घुगे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश आव्हाड, अक्षय आव्हाड, माजी नगराध्यक्ष आर. डी. सोनवणे, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, रवींद्र पाठक, शिवाजी खांडेकर, कालूअप्पा आव्हाड, दादासाहेब नाईकवाडे, जयप्रकाश आव्हाड, संदीप देवकर, सरपंच सतीश केकाण, उपसरपंच नितीन सांगळे, प्रसाद कातकडे, सोपान केकाण, कैलास सानप, सागर घुले, सतीश घुले, संजय घुले, प्रकाश बोऱ्हाडे, विश्वनाथ बारगळ, जनार्दन कांगणे, संदीप सांगळे, जनार्दन सानप, रमेश बोडखे, शुभम सानप, माधवराव बोडखे, संजय बोडखे, कृष्णराव सानप, विजय सानप, संतोष सानप, संदीप उगले, बाळासाहेब सानप, साहेबराव सानप, अशोक सानप, बद्रीनाथ सांगळे, अनिल सांगळे, धोंडिबा सांगळे, जयराम सांगळे, प्रभाकर आव्हाड, विनोद सोनवणे, सागर सांगळे, माधव कुटे, मोहन सांगळे, संभाजी कापकर, राजेंद्र गोरे, सोमनाथ गोरे, विष्णू कालेवार, दिगंबर गोरे, मुकुंद कालेवार, विलास आव्हाड, बाबासाहेब आव्हाड, योगेश सांगळे, संजय सांगळे, अनुराग येवले, संजय वाबळे, शंकर गायकवाड, प्रकाश सांगळे, सचिन सावंत, गोपीनाथ सोनवणे, अनिल आव्हाड, पप्पू कराड, अभिषेक आव्हाड, निशांत काले, शुभम गिते, सतीश गर्जे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे, मंजित आव्हाड, योगेश आव्हाड, दिलीप आव्हाड, रामदास वरकड, चंद्रकांत आव्हाड, शंतनू विघ्ने, विनायक आव्हाड, सोमनाथ आढाव, रवींद्र खाडे, नितीन दराडे, पंकज आव्हाड, गणेश घुगे, भागीनाथ आव्हाड, दिनेश घुगे, अनिल दराडे, मंगेश आव्हाड, प्रकाश आव्हाड, आनंद दराडे, किशोर दराडे, मनोज आव्हाड, संतोष आव्हाड, अनिकेत दराडे, कृष्णा दराडे, दिलीप आव्हाड, एकनाथ दराडे, राजेंद्र सांगळे, विशाल गोर्डे, गोरखनाथ विंचू, किसनराव सांगळे, प्रकाश सांगळे, सुनील काजळे, सुमित चौधरी, अजित विंचू, सोमनाथ सांगळे, गोकुळ विंचू, सुनील विंचू, पदमाकर विंचू आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.