भाव न मिळाल्यानं राहुरीत शेतकऱ्यांने केली कांद्याची होळी

0

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे :  

              अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा कडेलोट केला.हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला.पिक उभे करण्यासाठी लाखो रुपये गुंतवणुक करुनही उत्पन्न हातात पडेल याची शाश्वती नाही. जुगार प्रमाणे हार जीतीचा खेळ खेळत नशिब आजमवण्याचा प्रकार सध्या शेतकऱ्यांबरोबर घडत आहे. राहुरी तालुक्यातील मानोरी येथिल शेतकऱ्यांने पावसाच्या तडाक्यातून वाचलेला कांदा बाजार समितीत विकण्यासाठी नेला.त्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. अखेर  वैतागलेल्या शेतकऱ्यांनी नैराश्यातून शेतातच कांद्याची होळी करुन शिमगा केला..

             एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काढलेला कांदा भिजल्याने सडून गेला परंतु शासनाच्या आदेशाप्रमाणे शेतात उभा असलेल्याच पिकांची पंचनामे करण्यात आले.परंतू त्याची भरपाई मिळेल याची शाश्वती नाही.नैसर्गिक संकटापुढे सर्वांनीच हात टेकले आहे.तीन महिण्यापुर्वी पंचनामे करताना काळे कागद केले. परंतू सरकार कडून एक छदामही भरपाई मिळाली नाही.हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला असल्याने पिके उभे करताना भरमसाठ खर्च केला.तो खर्च पावसाच्या पाण्यात वाहुन गेला.शेतकरी आर्थिक संकटात सापडला गेला. जेमतेम पिक हाथी लागले पण बाजार समितीत त्यालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी नैराशाच्या वाटेवर येवून थांबला आहे.

               राहुरी तालुक्यातील मानोरी  येथील शेतकरी अमोल विलास भिंगारे या शेतकऱ्याने तीन एकर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची पीक घेतले होते. मशागती पासून कांदा पिकाची उत्तम प्रकारची काळजी घेतली सुरुवातीला दर्जेदार बियाणापासून रोपे तयार करून त्या रोपाची आपल्या शेतात मजुरांकडून लागवड करून घेतली रासायनिक खते फवारणी योग्य रीतीने केल्याने कांदाचे पीक जोमात आले कांदा काढणीला आल्याने दरम्यान मजुराचा तुडवा झाला त्यांनी मजुराला वाढीव मजुरी देऊन कांदा काढून घेतला त्या कांद्याची शेतातच पोळ घालून त्या कांद्याला पाती खाली झाकून ठेवला ठेवला. मात्र दुर्दैवाने राहुरी तालुक्यात मागील महिन्यात अचानक वादळी वारा व अवकाळी पाऊस झाल्याने आल्याने कांदा शेतातच भिजला पावसाने उघडीप दिल्यानंतर उशिरा जाग आलेल्या शासनाने पंचनामेचा फार्स सुरू केला आता आपल्याही कांद्याचा पंचनामा होईल या अशाने विलास भिंगारे यांना दिलासा मिळाला. परंतु शासकीय अधिकारी यांनी फक्त शेतात उभे असणाऱ्या पिकाचे पंचनामे करण्याचे आम्हाला आदेश असल्याने तुमच्या कांद्याचा पंचनामा करता येणार नाही. असे स्पष्ट शब्दात सुनावल्याने भिंगारे यांचा भ्रमनिराश झाला.  तोपर्यंत 50 टक्के कांदा खराब झाला होता. उरलेला कांदा राहुरी बाजार समितीत  विक्रीस नेला. प्रतिक्विंटल दीडशे ते चारशे पर्यंत भाव मिळाल्याने उत्पादन खर्च तर सोडाच मजुरीचा खर्चही निघेनासा झाला. भिंगारे यांनी सुमारे कांदा लागवडीपासून तर काढणी पर्यंत  लाखो रुपये खर्च केला.त्याच कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने  त्यांनी नैराश्यातून शेतात कांद्याच्या पोळी पेटून त्याची होळी केली.शेतकरी कांदा पिकावर कोणी ट्रॅक्टर घालतय, तर कोणी अंत्यविधी करुन शेतातच कांदा पुन्हा मातीआड करतय हे सर्व प्रकार नैराश्यातून केले जात असले तरी शेतकरी माञ आर्थिक संकटात सापडला गेला आहे.शेतकऱ्यांस पुन्हा उभारीसाठी काठीचा आधार म्हणजे आर्थिक नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.नाहीतर शेतकऱ्यांचा कडेलोट झाल्या शिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here