भास्कर वस्ती शाळेत गणपती फेस्टिवलचे आयोजन

0

कोपरगाव : चित्रकला स्पर्धेने जिल्हा परिषद भास्कर वस्ती शाळेच्या गणपती फेस्टिवलचे उत्साहात उद्घाटन कोपरगाव प्रतिनिधी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे दहा दिवस हा उत्सव चालत असतो. त्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती शाळेत सुद्धा गणपती फेस्टिवलचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात चित्रकला स्पर्धेने करण्यात आली. गणपती फेस्टिवल मध्ये माती पासून गणपती बनवणे चित्रकला रांगोळी संगीत खुर्ची, लिंबू चमचा मोदक स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी सांगितले. अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला चालना मिळते गती मिळते. असे अनेक उपक्रम भास्कर वस्ती शाळा नेहमी राबवत असते त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ पालक सर्वतोपरी मदत करत असतात. असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक भास्कर यांनी सांगितले या विविध उपक्रमांचे आयोजन शाळेच्या शिक्षिका ज्योती टोर्फे शिक्षक सुकलाल महाजन महिंद्र विधाते आदींनी केले आहे या विविध स्पर्धेमुळे मुलांच्या चेहऱ्यावर उत्साही भाव दिसत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here