पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे निभावणार..भालेराव
पोहेगांव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील जुन्या पिढीतील ग्रामपंचायतीचे सदस्य कै पुंजाजी कचरू भालेराव यांचे चिरंजीव भीमराज पुंजाजी भालेराव यांची भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कामाची माहिती पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगत पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे निभावणार असल्याचे भीमराज भालेराव यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रभावित होऊन गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदावर काम करत आपला एकनिष्ठेपणा सिद्ध केला. भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र पदाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही त्यांनी समर्थपणे पेलवली. त्यांनी भारतीय जनता पार्टी साठी केलेल्या कामाची दखल घेत वरिष्ठांनी त्यांची सरचिटणीस पदी निवड केली आहे. निवडीचे पत्र उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकुडकर, कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी, पार्टीचे उत्तर महामंत्री सुनील सिंग यांनी नुकतेच त्यांना दिले आहे.त्यांच्या निवडीबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.