भोजापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रस्तावित लघु पाटबंधारे प्रकल्पाला औरंगाबाद खंडपीठाची स्थगिती 

0

संगमनेर : सिन्नर तालुक्यातील भोजापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रस्तावित लघु पाटबंधारे प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. याबाबत निमोण परिसराच्या वतीने बी.आर चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली पळसखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.संध्या संदीप कांडेकर, संपत काशिनाथ कांडेकर,उपसरपंच  ज्ञानेश्वर मल्हारी घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने प्रस्तावित लघु पाटबंधारे प्रकल्पाला स्थगिती दिल्याने निमोण सह पंचक्रोशीतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. 

प्रवरा उपखोऱ्यातील भोजापूर धरणाच्या वरील बाजूस असलेल्या सिन्नर तालुक्यातील हिवरे (तवली ) गावामध्ये ५२६.०० स.घ. मि (१८.५० द.ल.घ.फू)साठवण क्षमतेच्या ल.पा बंधारा बांधण्यास जलसंधारण महामंडळाने दिनांक ९/ ५/ २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रवरा उपखोऱ्यातील म्हाळुंगी उपखोरे मुळातच अतिशय तुटीचे खोरे असल्याने तेथे नवीन बंधारेची कामे घेण्यास पाणी शिल्लक नाही ,असे असतानाही गोदावरी उपखोऱ्यामध्ये भविष्यात पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडील गोदावरी उर्ध्व खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. असे गृहीत धरून त्या पोटी सन २०१३ मध्ये गोदावरी उपखोऱ्यातील व कडवा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील वडांगळी येथे ल.पा योजनेसाठी जलविज्ञान नाशिक यांनी दिलेला पाणी उपलब्धता दाखला रद्द करून त्या ऐवजी प्रवरा उपखोऱ्यातील म्हाळुंगी उपखोऱ्यातील भोजापूर धरणाचे पाणलोट क्षेत्रातील हिवरे (तवली ) येथे ल.पा योजनेसाठी बदलणे हे पूर्णतः चुकीचे , बेकायदेशीर व म्हाळुंगी (प्रवरा उपखोरे )उपखोऱ्यातील जनतेवर अन्याय होणारे आहे. सदर कामाचे अंदाजे १०.५० कोटी रुपये रकमेची निविदा काढण्यात आलेली होती. भोजापूर धरणात आधीच पाण्याचा तुटवडा आहे, तसेच भोजापुर धरणावर अवलंबुन असलेल्या नांदूर शिंगोटे, दोडी,पळसखेडे व निमोण परिसरातील शेतकऱ्यांना पाणी कमी होणार आहे हे लक्षात आल्यामुळे निमोण परिसराच्या वतीने बी.आर चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली पळसखेडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.संध्या संदीप कांडेकर, संपत काशिनाथ कांडेकर, उपसरपंच ज्ञानेश्वर मल्हारी घुगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिका खंडपीठाने दाखल करून निविदेला दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी स्थगिती दिली. त्यामुळे निमोण परिसरातील शेतकऱ्यांनी बी.आर चकोर,सौ.संध्या कांडेकर, संपत कांडेकर व ज्ञानेश्वर घुगे यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here