देवळाली प्रवरा / प्रतिनिधी :
देवळाली प्रवरा येथील, जेष्ठ नेते प्रगतशील शेतकरी,माजी जिल्हा परिषद सदस्य, डॉ. तनपुरे कारखाना माजी संचालक मच्छिंद्र गजानन शिंदे उर्फ शिंदे पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी ते 85 वर्षाचे होत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी,पत्नी, सुना,नातवंडे असा परीवार असुन बाबासाहेब, राम,शामराव शिंदे यांचे ते वडील होत.शिंदे पाटील यांनी खरेदी विक्री संघ,मुळा सुतगिरणी, देवळाली प्रवरा सोसायटी आदी ठिकाणी संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या अंत्यविधीस परिसरातील राजकीय व्यक्ती, डाँक्टर,वकील व विविध पक्षाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.