मतदार संघ व निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्वच पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या – आ. आशुतोष काळेंच्या सूचना

0

कोळपेवाडी वार्ताहर :- Nilwande left cannel निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी योग्य नियोजन करून मिळालेल्या अतिरिक्त १.५ टीएमसी पाण्यातून मतदार संघ व निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्वच पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे Ashutosh Kale यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना अतिरिक्त १.५ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पाण्याचे योग्य नियोजन करून सर्व पाणी पुरवठ्याचे पाझर तलाव व लघु बंधारे भरून द्या जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत त्यासाठी पाटबंधारे विभागासह प्रशासनाने योग्य नियोजन करावे. पोलीस प्रशासनाने देखील गावागावात अंतर्गत वाद होणार नाही यासाठी खबरदारी घेवून सर्व पाझर तलाव व लघु बंधारे भरून देण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केल्या. या बैठकीसाठी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, निळवंडे कालव्याचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड, उपअभियंता दळवी, कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरसाठ आदींसह लाभक्षेत्रातील शेतकरी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here