*स्वच्छ व हरित संकल्पना राबविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद…*
कोपरगाव : मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी पुर्वनियोजीत सदिच्छा भेट घेतली . या भेटीत श्री साईबाबा संस्थान द्वारे प्रकाशित ‘स्वच्छ विचार ते स्वच्छ राष्ट्र’ या संकल्पनेसोबत स्वच्छता,जलसंवर्धन,वृक्षारोपण आणि पर्यावरण या विषयावर मध्यप्रदेश राज्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीद्वारे राबविण्याच्या संकल्पना नववर्षाच्या निमित्ताने भेट दिली आहे.
राज संस्थान,तीर्थक्षेत्र,विविध वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनासाठी मध्यप्रदेश राज्य प्रसिध्द आहे. भारतातून नामशेष झालेला चित्ता हा वन्यजीव नामीबीया येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने मध्यप्रदेश राज्यातील संगोपनासाठी ठेवण्यात आला आहे. सुस्वभावी आणि आदरपूर्वक सभ्य वर्तवणूकीमुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्यप्रदेश राज्यात ‘मामंजी’ या नावाने जनसामान्यांमध्ये ओळखले जातात. या सभ्यतेची जाणिव मुख्यमंत्री चौहान यांचेशी झालेल्या भेटीत झाल्याचे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सांगितले.
सुमारे सात मिनिटांच्या भेटीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिलेल्या संकल्पना ओझरत्या वाचन करत यातील काही मुद्यांवर संवादही केला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये या संकल्पना राबविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.दोघांनीही एकमेकांना नवं वर्षाच्या शुभेच्छा देत निरोप घेतला.