मराठा आरक्षण मिळेपर्यंत सोनेवाडीत राजकीय पुढाऱ्यांना गावंबंदी

0

ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला दिले निवेदन

सोनेवाडी (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे मराठा समाजासाठी Maratha reservation आरक्षण मिळावे या दृष्टीने सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत राजकीय पुढाऱ्यांना गावंबंदी करण्याचे निवेदन ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला देण्यात आले. या पाठिंबासाठी सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेत त्यात सर्व गोष्टी जाहीर केल्या.

यावेळी निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, किशोर जावळे,चिलु जावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, कर्णा जावळे, आबासाहेब जावळे, दिगंबर जावळे, संतु दहे, प्रशांत जावळे, धोंडीराम जावळे, रामदास जावळे, भाऊसाहेब खरे, मच्छिंद्र गुडघे, विनायक चव्हाण, पुंजाहरी आव्हाड, किशोर गुडघे,सार्तक गुडघे, संतोष जावळे, संदीप दहे ,किरण शिंदे, सागर जावळे, शिवाजी दहे, रंगनाथ गुडघे ,गोविंद जाधव, परसराम जावळे, विजय मिंड, रावसाहेब मिंड, हेमराज जावळे, अण्णासाहेब कांदळकर, संजय गुडघे, सचिन गुडघे ,सुरेश जावळे, सुमित पासलकर ,लहानु गोडसे, अर्जुन जावळे ,खंडेराव जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीत सर्वाणुमते गावामध्ये राजकीय पुढार्‍यांना येण्यास बंदी, गावातील कोणत्याही नागरिकांना राजकीय कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय, मराठा समाजाला आरक्षण वेळेपर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन, आरक्षण वेळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार अदी प्रकारचे निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आले. कालच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय पुढाऱ्यांची मोठी गोची होणार असून त्यांनीही मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पुढाकार घ्यायला हवा असे चर्चा यावेळी रंगली. वरील विषयाचे व  पुढार्‍यांच्या गाव बंदीचे बॅनर चौकात लावण्यात येणार असल्याची यावेळी जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here