मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी शेखर पानसरे ;

0

गायकवाड,नरवडे उपाध्यक्ष तर नेहे कार्याध्यक्ष

संगमनेर : राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेची संगमनेर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून मराठी पत्रकार परिषदेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी शेखर पानसरे, उपाध्यक्षपदी आनंद गायकवाड आणि राजु नरवडे यांची तर कार्याध्यक्षपदी गोरक्ष नेहे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, अमोल वैद्य यांनी दिली.

           उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी घोषित केलेल्या कार्यकारणीत चिटणीसपदी संदीप इटप , सहचिटणीसपदी मंगेश सालपे, खजिनदारपदी सुनील महाले , संपर्कप्रमुखपदी संजय अहिरे व नीलिमा घाडगे , प्रसिद्धी प्रमुखपदी भारत रेघाटे , संघटकपदी धीरज ठाकूर , कार्यकारणी सदस्य म्हणून राजा वराट , शिवाजी क्षीरसागर , श्याम तिवारी , चंद्रकांत शिंदे पाटील, गणेश भोर, नितीन ओझा , आदेश वाकळे , अनंत पांगारकर, अमोल मतकर , संजय गायकवाड , रामप्रसाद चांदघोडे , नितीन शेळके, अंकुश बुब, सुशांत पावसे आदींची निवड करण्यात आली असून  मार्गदर्शक म्हणून किसन भाऊ हाले, राजेंद्रसिंह चव्हाण, शिवपाल ठाकूर हे असतील. नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी व्यक्त केली. नूतन पदाधिकारी व कार्यकारणीचे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, प्रदेश प्रतिनिधी सुनील नवले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, सल्लागार संदीप वाकचौरे, कार्यकारणी सदस्य सचिन जंत्रे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here