कोपरगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या महसूल सहायक पदाच्या (गट क) निकालामध्ये महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यामध्ये सुदेश दीपक शेलार, कु. गीतांजली मिलिंद मोकळ, युवराज दिगंबर घनघाव, प्रशांत रमेश पाईक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथकाका शिंदे तसेच महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. माधव सरोदे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. मोहन सांगळे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक डॉ. निलेश मालपुरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र समन्वयक प्रा. संजय गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदनकरून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.