मुंबई :राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. . ठाकरे गटाची सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणीस सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला . तसेच न्यायालयाने पुढील सुनावणी २१ आणि २२ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे स्पष्ट केले . सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. या प्रकरणी कालपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन्ही बाजूचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता .ठाकरे गटाच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती तर शिंदे गटाकडून जेष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता .