‘महाराष्ट्र शाहीर’ जयेश खरे

0

 शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नातू केदार शिंदे ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेला  महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे दुसरे गाणे म्हणजेच ‘गाऊ नको किसना’ हे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या   गाण्याला गुरु ठाकूर यांचे बोल व अजय अतुल यांचे संगीत असल्याने अर्थातच हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण त्याहीपेक्षा या गाण्याची खासियत ठरतोय हे गाणं गाणारा गायक.हा बाल गायक राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथिल जयेश खरे हा असुन तो नेवासा तालुक्यातील करजगाव येथिल रयत शिक्षणसंस्थेच्या श्री.छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे.

            जयेश सध्या सहावी इयत्तेत शिकत आहे. जयेशचा गाणं गातानाचा व्हिडीओ त्याच्या वर्गशिक्षक कृष्णा राठोड यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शुटींग करुन  सोशल मीडियावर शेअर केला. अल्पावधीतच या व्हिडिओला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जयेशच्या गाण्याचं अनेकांनी कौतुक केलं. हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल याची कल्पना देखील कोणी केली नव्हती.चंद्रा गाण्यानं सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला लिटील चॅम्प जयेश खरेला मोठा ब्रेक मिळालाय… शाहीर साबळेंच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये छोट्या शाहीरांचे गाणे गाण्यासाठी  संगीतकार अजय अतुल यांनी जयेशला संधी दिलीए… जयेश हा सहावीत आहे…. पण आता जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळणार आहे….शाहिरांच्या लहानपणीच्या गाण्यासाठी गायकाच्या शोधात असतानाच जयेशचा व्हायरल व्हीडीओ समोर आला आणि अजय अतुल यांनी गुणवत्ता हेरत त्याला संधी दिली…. दरम्यान जयेश खरेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हीडिओ पाहुयात ज्यामुळे जयेशला महाराष्ट्र शाहीर सिनेमात गाण्याची संधी मिळाली.

                    केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना  खूप आवडला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची गाणी देखील  प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडले आहे.’महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘गाऊ नको किसना’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शाहीर साबळे यांच्या बालपणाचे दर्शन या गाण्यातून घडते. हे गाणे ‘चंद्रा’ गाण्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला चिमुकला जयेश खरेने गायले आहे.जयेश खरे हा राहुरी तालुक्यातील वांजुळपोई या खेड्यातील असुन एका खेड्यातील बाल कलाकार ‘महाराष्ट्र शाहीर’ या चिञपटातुन झळकणार आहे. 

                 काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत एक चुणचुणीत मुलगा चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणं गाताना दिसला. शाळेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उभा राहून या मुलाने चंद्रा हे गाणं अगदी सुरात गायलेलं पाहायला मिळालं. स्वतः अमृता खानविलकर हिने देखील या चिमुरड्याच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. अवघ्या दोन दिवसातच त्याचा हा व्हिडीओ तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला. त्यामुळे हा मुलगा कोण? याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झाली होती. हा चुणचुणीत मुलगा जयेश खरे हा नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांजुळपोई या खेड्यागावातील रहिवाशी आहे.

                जयेश सध्या सहावी इयत्तेत शिकत आहे. जयेशचा गाणं गातानाचा व्हिडीओ त्याच्या वर्गशिक्षक कृष्णा राठोड यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये शुटींग करुन  सोशल मीडियावर शेअर केला. अल्पावधीतच या व्हिडिओला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि जयेशच्या गाण्याचं अनेकांनी कौतुक केलं. हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल याची कल्पना देखील कोणी केली नव्हती. जयेश एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेला मुलगा. त्याचे वडील विश्वास खरे हे ऑर्केस्ट्रा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवण्याचे आणि गायनाचे काम करतात. परंतु वर्षभर लग्नसराई नसते त्यावेळी ते शेतात मजुरीचे काम करतात. यातूनच त्यांना जे पैसे मिळतात त्यातून त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतो. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे जयेशच्या वडिलांना नावाजलेले गायक होता आलं नाही.

                मात्र जयेश याच्या वडीलाने पाहिलेलं स्वप्न ते त्यांच्या मूलाकडून पूर्ण करून घेताना दिसत आहेत. आपल्या मुलाने गाणं शिकावं भविष्यात खूप मोठा गायक बनावं अशी त्यांची मनापासून ईच्छा आहे. जयेशला शास्त्रीय संगीत शिकता यावं यासाठी ते मेहनत घेण्यासही तयार आहेत. मात्र ग्रामीण भागात राहत असल्याने या सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत. वडिलांकडूनच तो सध्या गाण्याचे धडे गिरवत असल्याने त्याच्या गायकीमधून गाण्यामधले सूर ताल त्याला गवसलेले पाहायला मिळतात. त्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मधूनच भविष्यात तो मोठा गायक बनू शकेल असा विश्वास तमाम प्रेक्षकांना वाटतो आहे. 

            दिग्दर्शक केदार शिंदे त्यांचे आजोबा ‘शाहीर साबळे’ यांच्या जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटही ‘बहराला हा मधुमास’ हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी देखील ताल धरला.’बहराला हा मधुमास’ या गाण्याच्या यशानंतर ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘गाऊ नको किसना’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. शाहीर साबळे यांच्या बालपणाचे दर्शन या गाण्यातून घडते. हे गाणे ‘चंद्रा’ गाण्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथिल चिमुकला जयेश खरेने गायले आहे.

           ‘गाऊ नको किसना’ गाण्याचं संगीतकार जोडी अजय-अतुल आणि केदार शिंदे यांनी अजय सर्व चिमुरड्यांकडून गाणे गाऊन घेतले आहे. या गाण्यासाठी  वेगवगेळ्या वाद्यांची झलक वापरण्यात आली आहे. या यशस्वी गाण्यामागची मेहनत पाहून एका खेड्यातील जयेश खरे याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी लागेल.

             जयेश यास वडील विश्वास खरे, संगीत शिक्षक सुनील पारे यांचे तर जयेश यास पहिले व्यासपीठ निर्माण करुन देणारे सोनु साठे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच करजगाव ता.नेवासा येथिल छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम.परदेशी कलाशिक्षक सुभाष चारुडे तसेच वांजुळपोई येथील मराठी शाळेतील शिक्षक  सुरेश गिऱ्हे,  सचिन हरिश्चंद्रे, ललिता कल्हापुरे त्यास कलेस नेहमी प्रोत्साहन देत आहे. 

             संपूर्ण महाराष्ट्रात जयेश याने गायलेलं चंद्रा गाणे व्हायरल झाल्यानंतर आज तो त्याच्या शाळेत परतल्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचे कौतुक केले. यावेळी जयेश याने पुन्हा टाळ्यांचा कडकडाट करत वर्गमित्रांनी कौतुक केले. जयेश याने काही महिण्यापुर्वी   ‘मी होणार सुपरस्टार’, छोटे उस्ताद या कार्यक्रमात आपल्या आवाजाचा जलवा दाखवत १८ व्या फेरीपर्यंत पोहचला होता. गायक आदर्श शिंदे, सचिन पिळगांवकर, गायिका वैशाली सामंत यांची वाहवा मिळविली  होती. जयेशच्या गाण्यांनी उत्साहित होऊन आदर्श शिंदेंना यांना सुद्धा जयेशबरोबर गाणे गाण्याचा मोह आवरला नाही. ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ हे गाणे त्याच्याबरोबर गायले होते.’महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक या चित्रपटाचा आनंद घेत आहेत.

 राजेंद्र उंडे ,जेष्ठ पञकार  9890233714

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here