महारुळीला अंखड हरिनाम सप्ताहाचे सांगता 

0

जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील महारुळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २० ऑगस्ट रोजी पासून २६ ऑगस्ट पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.हभप नागनाथ महाराज ढगे यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह्याची सांगता झाली.

   

या सप्ताहासाठी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आ. प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी माजी सभापती आशाताई शिंदे यांनी भेट दिली. यावेळी प्रा.लक्ष्मणराव ढेपे, नगरसेवक अमित जाधव, डॉ.कैलास हजारे, धनराज पवार,रामभाऊ ढेपे ,प्रकाश मुळे,महादेव ढेपे, बच्चू मुळे,धर्मा मुळे,अशोक ढेपे,नितेश ढेपे,हौसराव ढेपे,गणेश जगदाळे, विकास जगदाळे,आण्णा जगदाळे, गोकुळ ढेपे, पंडित थोरात, निलेश ढेपे, संतोष चव्हाण,सर्जेराव माने, रणजीत ढेपे,राजेंद्र ढेपे, पांडुरंग ढेपे,अशोक येवले आदी मान्यवर व महिला सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here