महिना अखेरीस डाटा रद्द झाल्याने गोरगरीब धान्या पासुन वंचित

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                 राहुरी तालुक्यात सप्टेंबर महिण्यातील धान्य वितरण 24 सप्टेंबर नंतर सुरु झाल्याने महिणा अखेर पर्यंत धान्य वितरण करण्यात आले. परंतु महिना अखेरीस डाटा रद्द झाल्याने अनेकजण धान्या पासुन वंचित राहिले आहेत.या बाबत राहुरीचे तहसिलदार यांच्याकडे चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता तहसिलदार पञकारांचे फोन घेत नसल्याचे सांगितले जात आहे.उशिरा धान्य वितरणासाठी देवून त्यांच्या चुकीची शिक्षा माञ गोरगरीबांना होत आहे.

             

 राहुरी तालुक्यात धान्य वितरणाचा बोजवारा उडाला असुन धान्य दुकानदारांना धान्य वितरणासाठी उशिरा धान्य द्यायचे कमी दिवसात धान्य वितरण करता येत नसल्याने अनेक रेशन धारकांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार पुढे आली आहे.महिणा अखेरीस धान्य वाटपाचा डाटा रद्द होत असल्याने अनेक जण धान्या पासुन वंचित राहिले आहे.मोफत मिळणाऱ्या धान्य वितरणाचा डाटा महिणा अखेरीस रद्द केला आहे.परंतू आनंदाचा शिधा प्रत्येक रेशन धारकास 100 रुपयांमध्ये दिला जात आहे. आनंदच्या शिध्यासाठी डाटा चालू ठेवला आहे.

           मोफत धान्य वाटपाचा डाटा रद्द करुन रेशन धारकांना वंचित ठेवण्याचा प्रकार रेशन वितरणांकडून होत आहे.धान्य घेण्यासाठी मोलमजुरी बुडून रांगेत उभे राहायचे दिवसभरात नंबर लागला तर ठिक नाहीतर दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहायचे असा पाच ते सहा दिवस दिनक्रम चालुच ठेवावा लागतो.अखेर महिणा अखेर पर्यंत धान्य मिळाले नाही.तर धान्य मिळत नसल्याने गोरगरीब धान्या पासुन वंचित राहिला जात आहे.

This image has an empty alt attribute; its file name is kolhe-1.jpg

तहसिलदार पञकारांशी बोलत नाही.

         उशिरा धान्य वाटप सुरु झाल्याने तालुक्यातील अनेक कुटुंबे मोफत धान्या पासुन वंचित असल्या बाबत माहिती घेण्यासाठी राहुरी तहसिलदार नामदेवराव पाटील यांच्याशी मोबाईल वरुन दिवसभरात पंधरा ते वीस वेळा संपर्क केला.परंतू तहसिलदार पाटील यांनी माञ फोन उचलण्याची तहसद्दी घेतली नाही. तहसिल कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांना फोन तहसिलदार पाटील यांना मोफत धान्या पासुन वंचित या बाबतची माहिती पाहिजे असल्याने फोन उचलण्यास सांगा असे सांगितले असता तहसिलदार पाटील पञकारांशी बोलत नाही.त्यामुळे तुमचा फोन उचलत नसतील असे उत्तर देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल;केदार राहुरी तालुक्यात सप्टेंबर महिण्यात धान्य दुकानदारांना धान्य पुरवठा उशिरा झाला आहे.धान्य वितरणासाठी अवघे सहा दिवस मिळाले आहेत. अनेक धान्य दुकानात मोफत धान्या पासुन वंचित राहिले असेल.30 सप्टेंबर रोजी सायंकाळी धान्य वाटपाचा डाटा रद्द होत असल्याने रेशन दुकानदार वंचिताना धान्य देवू शकत नाही.सप्टेंबर महिण्याचे धान्य नेण्याचे राहिलेल्या व्यक्तींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीने  पुन्हा डाटा अद्यावत करुन धान्य वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावीच लागेल.असे राहुरीचे पुरवठा अधिकारी सुदर्शन केदार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here