महिला अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करा: मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे 

0

कोपरगाव ; बदलापूर सह अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बदलापूर मद्ये अल्पवयीन मुलींना शाळेत एका नराधमाच्या दुष्ककृत्याचे अत्याचार सहन करावे लागले हे अतिशय मनाला खिन्न करणारे व माणुसकीला काळीमा फासणारे आहे.असे दोषी असणाऱ्या सर्वच आरोपींना अशा प्रकारची शिक्षा मिळावी की पुन्हा कुणाची हिम्मत महिलांकडे गैर नजरेने पाहण्याची होणार नाही अशी अपेक्षा मा.आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

कोवळ्या जीवांना अमानुष अत्याचाराचे शिकार व्हावे लागते हे दुःखद आहे.या घटना राजकीय नजरेने नाही तर एक संवेदनशील माणुसकीच्या भावनेने पाहून सर्वांनी एकत्र येत कृती करण्याची गरज आहे.महिला कुठलीही असो तिची अपेक्षा आज त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहवे,सुरक्षा द्यावी एवढीच आहे. समाजात इतर काही बाबतीत दुर्दैवी घटना घडतात,कुठे प्रसंग समोर येतात तेव्हा सर्वजण निषेध करतो,विविध ठिकाणी मत व्यक्त करतो.पण महिला सुरक्षेचा मुद्दा जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा केवळ निषेध करून भागणार नाही तर सामूहिक एकत्रित येण्याची गरज आहे.राजकीय पक्ष,जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन आपण सद्या एकत्रपणे अशा गैर कृत्याच्या गुन्हेगारांना काय कठोर सजा देता येईल यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.

नुकतेच रक्षाबंधन साजरे केले,त्यानंतर अशी घटना घडणे धक्कादायक आहे.अशी विकृत मानसिकता असणाऱ्या प्रवृत्ती वेळीच ठेचून काढण्याची गरज आहे. महिला सुरक्षा हा केवळ अत्याचाराच्या घटना झाल्यावरचा एखादा राजकीय मुद्दा न ठरता रोजच तो सर्वांनी प्राधान्याचा विषय ठेवला तर कठोर शासन होवून आरोपींना जरब बसवेल.महिलांना सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी कठोर पावले शासनाने उचलावे व नराधमाना कठोर शिक्षा करावी अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

प्रत्येक स्त्रीला समाजात सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षित वातावरण ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.प्रामुख्याने जिथे असे समाज कंठक आढळतील त्यांना एखादे वाईट कृत्य होण्याआधीच कायद्याचा आणि समाजाचा धाक उभा झाला पाहिजे ही काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here