महिलेला धडक देऊन ट्रकने मृतदेहाला नेले फरपटत 

0

नवी दिल्ली : दिल्लीमधील कंझावला येथे एका तरुणीला कारने फरपटत नेल्याची घटना घडली असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.  उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये स्कूटी चालवणाऱ्या एका महिलेला ट्रकने धडक दिली. त्यात तिचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहाला ट्रकने 3 किलोमीटर फरपटत नेले. 

या घटनेत ट्रकला आग लागली आणि त्यात स्कूटीही जळून खाक झाली.  संबंधित महिला आपल्या स्कुटीसह ट्रकमध्ये अडकल्याने ट्रकला आग लागली. या दुर्दैवी घटनेत पीडितेची स्कूटीही जळून खाक झाली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही महिला एका विद्यापीठात लिपिक होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here