देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
तूम्ही आमच्या नादी कशाला लागता, नाहीतर तूम्हाला मारावेच लागेल. असे म्हणून राहुरी तालूक्यातील पाथरे खुर्द येथिल एका महिलेस अकरा जणांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करत लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.
सुरेखा पाडुरंग पठारे, वय ४५ वर्षे, रा. पाथरे खु. ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सुरेखा पाडुरंग पठारे ह्या रस्त्याने जात असतांना महेश रावसाहेब पठारे हा त्यांना म्हणाला की, तुम्ही आमचे नादी कशाला लागता, नाहीतर तुम्हाला मारावेच लागेल. तेव्हा सुरेखा पठारे त्याला म्हणाल्या कि, तुम्ही आम्हाला कशाला विनाकारण त्रास देता. तेव्हा महेश पठारे हा मला शिवीगाळ करु लागला. तेव्हा तेथे इतर आरोपी आले व म्हणाले की, तुम्ही कायम आमचे नादी लागता असे म्हणून त्यांनी सुरेखा पठारे यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत सुरेखा पठारे यांचे कपडे फाटले तसेच गळ्यातील पोत व कानातील फुले तुटुन गहाळ झाले आहे. घटनेनंतर सुरेखा पाडुरंग पठारे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश पठारे व त्याच्या सोबत असणारे विलास आनंदा पठारे, वैभव विलास पठारे, अर्चना विलास पठारे, अमोल रावसाहेब पठारे, सुनिता रावसाहेब पठारे, सुनिल अंतोन पठारे, सुवर्णा सुनिल पठारे, किरण अगुस्तिन पठारे, बाळासाहेब अगुस्तिन पठारे, नंदा अगुस्तिन पठारे सर्व रा. पाथरे खु. ता. राहुरी. या अकरा जणांवर गुन्हा रजि. नं. ४५८/२०२३ भादंवि कलम ३२३, ४२७, ५०४, ५०६, १४३ प्रमाणे मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.