राहुरी तालुक्यातुन जाणाऱ्या नगर-मनमाड रस्त्याची झालेली दुरवस्थेने अनेकांचा बळी घेतला.जिल्ह्यातील मंत्री या महामार्गाचे भाग्य उजळतील असे सर्वांनाच वाटत होते.परंतू वर्षानुवर्ष भिजत पडलेला प्रश्न या हि वर्षी जसै थे राहिल्याने नगर मनमाडचे भाग्य काही उजळले नाही. राज्यात गाजलेल्या मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या खंडणीसाठी दुहेरी हत्याकांड झाले. या हत्याकांडामधील आरोपींना २४ तासांच्या आत राहुरी पोलिसांनी गजाआड केले. हि बाब पोलिसांना शाबासकी देण्याची असली तरी तालुक्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले असुन पोलिसांचा गुन्हेगारीवरील वचक कमी झाला आहे.सरत्या वर्षाला सलग दोन दिवस रस्तालुटीच्या घटना घडल्याने पोलिसांची अब्रु वेशीवर टांगली गेली.रस्तालुटीच्या घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरीत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. गुहा येथील धार्मिक जागेच्या वादावरून दोन समाजांत झालेले वाद, राजकीय उलथापालथ व लोकसभा व विधानसभेचा धक्कादायक निकाल,शिवाजी कर्डिले यांचा विजय, बिबट्यांचे हल्ले, वकील दाम्पत्याची हत्या अशा अनेक घटनांनी २०२४ वर्ष चांगलेच गाजले आहे.
■ बिबट्याचे हल्ले बालिका ठार, अनेक जखमी
राहुरी तालुक्यातील विविध भागात बिबट्याचे हल्ले वाढले आहे. तालुक्यातील वरवंडी येथिल वेदिका ढगे ही तीन वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. वरवंडी येथील तीनवर्षीय बालिका तिच्या वडिलांसोबत चारा आणण्यासाठी शेतामध्ये गेली असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालिकेवर हल्ला केला. यामध्ये बालिका जागीच ठार झाली. तसेच बिबट्याने तालुक्यामध्ये धुमाकूळ घालत अनेक शेतकरी तसेच पशुधनावर हल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले, तर पशुधन ठार झाले.
■ बस उलटली, विद्यार्थी जखमी
काही दिवसांपूर्वी लाला शेठ बिहानी विद्यामंदिर प्रशालेची शैक्षणिक सहल निघाली होती. नगर-मनमाड रोडला पडलेल्या कपारींमुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यामध्ये ४५ विद्यार्थ्यांसह शिक्षक थोडक्यात बचावले.
■ नगर-मनमाड रोडचा प्रश्न जैसे थे
राहुरी तालुक्यातुन जाणारा नगर-मनमाड राज्य महामार्ग अत्यंत निकृष्ट झाल्याने गेल्या वर्षभरामध्ये या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू होती. या अपघातामध्ये अनेकांचे बळी गेले असून,अनेकांना कायमचे अपंगत्व आले. यामध्ये अनेकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. या रस्त्याच्या कामावरून व कमिशनवरून नेतेमंडळींमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. तरीही हा रस्ता पूर्ण झाला नाही. यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली.परंतू नगर मनमाड महामार्गाचे भाग्य काही उजाळले नाही.
■ वकील दाम्पत्याची हत्या
राहुरी तालुक्यात वकील दांम्पत्याची हत्या झाली. हि घटना राज्यात गाजली हे वकील दांम्पत्य राजाराम आढाव व मनिषा आढाव हे मनोरी येथील रहिवाशी होते.वकील दाम्पत्याची खंडणीसाठी दुहेरी हत्याकांड घडले.या हत्याकांडातील आरोपी हर्षद ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने न्यायालया समोर खुनाचा घटनाक्रमाचा उलगडा झाला आहे.हत्याकांडामधील आरोपींना २४ तासांच्या आत राहुरी पोलिसांनी गजाआड केल्याने वकील दांम्पत्याचे मृतदेह उंबरे येथील स्मशानभूमीतील विहिरीतून सापडले.
■ माजी आ. मुरकुटे यांच्यावर गुन्हा
राहुरी तालुक्यातील एका महिलेने माजी आ,भानुदास मुरकुटे यांच्यावर अत्याचारा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. माजी आमदार मुरकुटे यांना राहुरी पोलिसांनी रात्रीच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत गजाआड केले. हा गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय षडयंत्राचा वापर केला असल्याची चर्चा राहुरी तालुक्यात सुरु होती.
■ कुलसचिवपदाच्या नियुक्तीवरून कलगीतुरा
राहुरी विद्यापीठामध्ये कुलसचिवाच्या निवडीवरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. तत्कालीन प्रभारी कुलसचिव विठ्ठल शिर्के यांना कुलगुरु पाटील यांनी पदमुक्त करून त्यांच्या जागेवर राज्य शासनाचे महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आनंदकर यांना कार्यमुक्त केले. त्यांच्या जागेवर डॉ. मुकुंद शिंदे यांना सचिवपदाचा कार्यभार दिला. यामुळे विद्यापीठ प्रशासनामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
■ गुहा गावात देवस्थानच्या जमिनीवरून समाजात वाद
राहुरी तालुक्यातील गुहा येथील वादग्रस्त जमिनीच्या वादावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाली होती. यावरून गुहा गावामध्ये व तालुक्यात सामाजिक सलोखा बिघडला होता. मात्र प्रशासनामुळे हा वाद कायदेशीर असल्याने दोन्ही समाजांना विश्वासात घेऊन न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन केले होते. मात्र त्यानंतर वादग्रस्त जागेवर जाऊन मूर्ती बसविल्याने तणाव निर्माण झाला होता.
■ गुन्हेगारीचा वाढता आलेख
राहुरी तालुक्यात गुन्हेगारीने पुन्हा वर डोके काढले आहे.वर्षाच्या सरत्या दिवसाला सलग दोन दिवस रस्ता लुटीच्या घटना घडल्या आहेत.पोलिसांना रस्तालुटीतील आरोपींच्या मुसक्या आवळता आल्या नाहीत.छोट्या गुन्ह्यांबरोबर मोठ्या गुन्ह्यांची संख्या रोडावली आहे. चोऱ्यां,घरफोडी मोटारसायकल चोरी, विजपंप चोरी आदी गुन्ह्यातील आरोपी जेरबंद केले असले तरी माञ या घटना वारवार घडत असल्याने या गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे.एकंदरच पोलिस तपासात पोलिसांचा निषकाळजी पणा गुन्हेगारांना अभय देण्यासाठी यशस्वी झाले आहे.
■ डाँ.तनपुरे कारखान्या बाबत केवळ आश्वासनच
लोकसभा व विधानसभा निवडणूकीत तनपुरेंच्या कामगारांनी विरोधात प्रचार करण्याची घोषणा केल्याने आ.शिवाजीराव कर्डीले यांनी कामगारांचा मेळावा घेवून कारखान्याबाबत व कामगारांच्या मागण्या बाबत सकारत्मक निर्णय घेवून कारखाना चालू करण्यासाठी हालचाली करण्याचे आश्वासन वर्ष सरले तरी पूर्णत्वास गेले नाही.
■ शालेय विद्यार्थ्यांना फाटके कपडे
शालेय विद्यार्थ्यांना राज्यभर एकच गणवेश असावा असा निर्णय सरकारने घेतला राज्य सरकार मार्फत पंचायत समिती शिक्षण विभागा मार्फत बचत गटामार्फत गणवेश शिलाई करुन विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. परंतू हे सर्व गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्याचे राहुरी तालुक्यातील वळण येथील जिल्हा परिषद शाळेला शासनाच्या मोफत गणवेश योजने अंतर्गत पुरविलेले निकृष्ट गणवेश नाकारण्याचे धाडस दाखविल्याने निकृष्ट गणवेशाला वाचा फुटली.