संगमनेर : काँग्रेसचेे वरिष्ठ नेतेे तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या विविध योजना राबवून संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल बनवला आहे. हीच विकासाची घोडदौड कायम राखताना तालुक्यातील विविध गावांसाठी क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मिळवला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात सातत्याने विकासाच्या योजना राबवताना पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील क वर्ग तीर्थक्षेत्र विकासाच्या योजनेअंतर्गत या तीर्थक्षेत्रांच्या सोयी सुविधा करता १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. या अंतर्गत अकलापूर येथील दत्तात्रय देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, कौठे बुद्रुक येथील खंडोबा देवस्थान परिसर सुशोभीकरण ५ लाख रु., पेमगिरी येथील पेमादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण १० लाख रु, संगमनेर खुर्द येथील अमृतेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण ५ लाख रुपये, धांदरफळ खुर्द येथील बिरोबा मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरण १५ लाख रु, खांजापूर येथील अग्नेश्वर मंदिर देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रु., पारेगाव बुद्रुक येथील रेणुका मंदिर परिसर सुशोभीकरण ५ लाख रु, साकुर येथील वीरभद्र मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपये, सायखिंडी येथील खानेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण ५ लाख रु, कासारा दुमाला येथील हरि पुरुषोत्तम मंदिर परिसर सुशोभीकरण १५ लाख रु. आणि चिखली येथील भागवत बाबा देवस्थान परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून या मंदिर परिसरामध्ये काँक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक बसवणे, लाईट सुविधा, पिण्याचे पाणी यांसह विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.या तीर्थक्षेत्रांना मिळालेल्या निधीबद्दल अकलापूर, कौठे, पेमगिरी, संगमनेर खुर्द, धांदरफळ खुर्द , खांजापूर,पारेगाव बुद्रुक, साकुर, सायखिंडी, कासारा दुमाला व चिकणी येथील ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले असून या मिळालेल्या निधीतून वरील विविध गावांमधील क तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिर परिसराच्या सुशोभीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.