कोपरगांव प्रतिनिधी : माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे पुण्यतिथी ते जयंती दरम्यान संबंध जिल्ह्यात विविध स्तुत्य उपक्रम संपन्न झाले असुन कोपरगाव तहसील कचेरी मैदानात संगीतमय राम कथा सांगता कार्यक्रम काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाला. त्यावेळी संवत्सर येथील लेखक व श्री पंडित भारुड सर यांनी माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांचे जीवन कार्यावरील शेती ,सहकार, सिंचन, शिक्षण, समाजकारण, राजकारण ,दूध, बँकिंग, औद्योगीकरण आदि क्षेत्रात भरीव योगदान दिलेले असुन ते समाजापर्यंत घरा घरात पोहोचावे त्यासाठी त्यांच्या संपूर्ण जीवनकार्य व चरित्रावर आधारित ‘विजयी गाथा सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब’ या डॉक्युमेंटरीचे पुन: प्रकाशन सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते पुन: प्रकाशित करण्यात आले.
त्यावेळी फिल्म निर्माते पंडित भारुड सर शिंगणापूर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच डॉ. विजय काळे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने ही डॉक्युमेंटरी फिल्म विविध शाळा मध्ये दाखवण्यात आली असून पंडित भारुड सर यांनी माजी मंत्री स्वर्गीय शंकरावजी कोल्हे यांच्या जीवनावर लेखन केले असून त्यांनी चरित्र लेखन ,गाणे, पोवाडे तयार केलेले आहे .या माध्यमातून पुढच्या पिढीला कोल्हे साहेबांचे कार्य माहिती होण्यासाठी ते व्याख्यान व फिल्म द्वारे प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भारुड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या या विजयी गाथा या कोल्हे साहेब यांच्या प्रबोधनात्मक व सुंदर फिल्म निर्माती बद्दल ग्रामस्थांनी सर्वांनी अभिनंदन केले.